खासदारांची लोकप्रियता तपासण्यासाठी दिल्लीत होणार सर्वेक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील आपल्या खासदारांची लोकप्रियता तपासण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी दिल्लीचे सर्वेक्षण करणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने राजधानीतील सर्वच्या सर्व सातही जागा जिंकल्या होत्या. सन २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला असेच यश मिळण्यासाठी भाजपने आढावा घेण्यासाठी आणि नवी आव्हाने जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणातून आलेल्या माहितीच्या आधारे निवडणुकीसाठी नियोजन केले जाणार आहे.

[amazon_link asins=’B0747QB79S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’472d126d-aa7d-11e8-aa4f-5d02683274ea’]

एका कन्सल्टन्सी कंपनीमार्फत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. आपल्या या सात खासदारांचा मतदार पुढील निवडणुकीत स्वीकार करतील काय? हे जाणून घेण्याबरोबरच त्यांनी या कालावधीत केलेली कामगिरी, सरकारच्या विविध योजनांचे क्रियान्वयन आणि कार्यक्रमांचा प्रभावही या सर्वेक्षणामुळे जाणून घेता येणार आहे. यासाठीची प्रश्‍नावली तयार केलेली असून मिळालेली माहिती राष्ट्रीय आणि दिल्लीच्या युनिट्‌सकडे पाठवण्यात येईल.

दिल्लीत आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसचे भाजपपुढे मुख्य आव्हान आहे. या दोन पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात त्याच्याच पक्षांना जास्त जागा मिळणार असल्याचे दिसून आल्याने भाजप धास्तावला आहे. त्यामुळे भाजपनेही सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे मागील पाच वर्षात भाजपने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार असून मतदारांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

पेंडीसोबत म्हशीने गिळले पाच तोळ्याचे मंगळसूत्र