देशात गांजा ओढण्यात दिल्‍ली नंबर 1 वर तर मुंबई दुसर्‍या क्रमांकावर, वर्ल्डमध्ये ‘हा’ देश टॉपवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांजा ओढण्याच्या बाबतीत राजधानी दिल्ली देशात पहिल्या क्रमांकावर आहे तर आर्थिक राजधानी मुंबई दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगभरातील रँकिंगवर एक नजर टाकल्यास या रँकिंगमध्ये दिल्ली तिसर्‍या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. असा दावा एका सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे. अहवालानुसार, 2018 मध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा ओढण्याच्या दृष्टीने दिल्ली आणि मुंबई हे जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये आहेत.

जर्मनीमध्ये कार्यरत असलेल्या डेटा – आधारित मीडिया मोहिम एबीसीडीने हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. ही संस्था गांजाला वैधानिक दर्जा देण्याची मागणी करते आणि त्यासाठी गांजा किंमत निर्देशांकही जारी करते. महत्त्वाचे म्हणजे भारतात गांजा बंदी आहे.

सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी दिल्लीने 38.3 टन आणि मुंबईने 42.4 टन गांजाची विक्री केली होती. न्यूयॉर्कमध्ये जगातील सर्वात जास्त गांजा सेवन करणारे लोक आहेत. 2018 मध्ये येथे 77.4 टन गांजाचे सेवन केले गेले. त्यापाठोपाठ पाकिस्तानातील कराची असून त्याठिकाणी 42 टन गांजा विकला गेला आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस हे शहर 36 टनसह चौथ्या आणि 24.55 टनासह शिकागो आठव्या क्रमांकावर आहेत. या व्यतिरिक्त कायरा (5 वा 32.2 टन), लंडन (7 वा, 31.4 टन), मॉस्को (9 वा, 22.9 टन) आणि टोरंटो (10 वा, 22.7 टन) यांचा देखील या यादीत समावेश आहे.

 

You might also like