Video : दुचाकीस्वाराने भरदिवसा हिसकावली सोनसाखळी, ‘थरारक’ व्हिडिओ CCTV त कैद

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे दिल्लीतील नागरिक हैराण असून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. ग्रेटर केलाश इथे दोन दुचाकीस्वारांनी एका महिलेची चेन ओढल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

या व्हिडीओमध्ये दुचाकीवरून जात असलेले दोन तरुण समोरून येणार्‍या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पसार झाले आहेत. मागे बसलेल्या दुचाकीस्वाराने चेन हिसकावल्याचे दिसून येत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील चेन खेचण्याचा हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.