CCDचे संस्थापक सिध्दार्थ यांच्या मृत्यूला वेगळं ‘वळण’, ‘हवाला’शी संबंध असल्याची चर्चा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा अखेर मृतदेह सापडला आहे. नेत्रावती नदीमध्ये सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र आता त्यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिट्ठीत कर्जबाजारीपणामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते, मात्र आता याबाबत नवीन माहिती समोर अली असून त्यांचा हवाला प्रकरणाशी संबंध होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

सिद्धार्थ यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्टीतील सही आणि त्यांच्या कागदपत्रांवरील सही हि वेगळी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ करण्यात आल्याचे देखील त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या रहस्यमयी सहीमुळे त्यांचे नाव हवाला प्रकरणाशी देखील जोडले जाण्याची शक्यता आहे.

सिद्धार्थ यांचे नाव सिंगापूरमधील एका व्यक्तीशी जोडले जात असून त्या व्यक्तीकडून १ कोटी २० लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हि रक्कम सिद्धार्थ यांची असल्याची माहिती देखील या व्यक्तीने दिल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणात सिद्धार्थ यांच्या मोबाईल कॉलची चौकशी करत असून त्यांचा हवाला प्रकरणाशी संबंध आढळून आल्यास राजकीय क्षेत्रासाठी मोठी खळबळजनक बातमी असणार आहे.

सात हजार कोटींचे कर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, कॅफे कॉफी डे वर ७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज होतं. सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या CFO सोबत ५६ सेकंदांसाठी बातचित केली होती. यामध्ये त्यांनी CFO ला आपल्या कंपनीची योग्यपद्धतीनं देखभाल करण्यास सांगितलं. यावेळेस ते नैराश्यामध्ये देखील होते. त्यामुळे देखील त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय