दिल्ली विधानसभा : ‘या’ 9 जागांवर ‘काटे की टक्कर’, ‘बंडखोरी’ ठरणार ‘डोकेदुखी’, केजरीवालांच्या 3 मंत्र्यांची प्रतिष्ठेची ‘लढाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० च्या पार्श्वभूमीवर ७० जागांवर आज मतदान होणार आहे. दरम्यान या एकून जागांपैकी ९ अश्या जागा आहेत जिथे ‘काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. यात बदरपुर, चांदनी चौक, कालकाजी, शकूर बस्ती, सीमापुरी, नजफगड, मॉडेल टाऊन, सीमापुरी आणि द्वारका यांचा समावेश आहे. अनेक दिग्गज मंत्र्यांचे भविष्य या जागांवर अवलंबून आहे.

बदरपूर – आम आदमी पक्षाचे आमदार नारायण दत्त शर्मा यांनी बदरपूर विधानसभा जागी बंडखोरी केल्याने ही निवडणुक अधिक रंजक बनली आहे. शर्मा यांना तिकीट न मिळाल्याने बहुजन समाज पक्षाकडून या जागेवर निवडणूक लढवत आहे. तसेच भाजपचे उमेदवार रामवीरसिंग बिधुरी, आम आदमी पक्षाचे उमेदवार रामजी सिंह ‘नेताजी’ आणि कॉंग्रेसचे प्रदीप यादव यांच्यात हा बहुरंगी सामना रंगणार आहे.

मॉडल टाउन – दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यामुळे येथील निवडणूक महत्वपूर्ण बनली आहे. यांच्यासोबतच आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश पाटी त्रिपाठी आणि काँग्रेसमधील आकांक्षा ओला यांच्यात ही तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

राजेंद्र नगर – नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघांतर्गत राजेंद्र नगर मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रवक्ते राघव चड्डा हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यांच्यासमोर कॉंग्रेसचे उमेदवार रॉकी तुसीद तर भाजपचे उमेदवार आरपी सिंह हे बलाढ्य उमेदवार मैदानात उतरणार आहेत.

नजफगढ – कैलाश गहलोत हे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील नजफगड मतदारसंघातील अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून अजित सिंग खरखरी आणि कॉंग्रेसने साहेबसिंग यांना उमेदवारी दिली आहे.

शंकर बस्ती – नवी दिल्ली विधानसभा शंकर बस्ती या मतदारसंघात राज्य सरकारमध्ये आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. एस.सी. वॅट्स आणि कॉंग्रेसचे देवराज अरोरा यांचे कडवे आव्हान आहे.

सीमापुरी – या जागेवर न्याय आणि सशक्तीकरण विभाग मंत्री, राजेंद्र पाल गौतम हे आप सरकारकडून मैदानात उतरणार आहेत. त्याचबरोबर युतीच्या नेतृत्वात ही जागा भाजपचा मित्रपक्ष लोक जनशक्ती पक्षाच्या खात्यात गेली आहे. यासह कॉंग्रेसचे वीरसिंग धिगांनही मैदानात उतरणार आहेत.

द्वारका – देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांच्यामुळे ही जागा चर्चेत आहे. यांच्यासोबतच तर कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार महाबळ मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा ही आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून प्रद्युम्न राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कालकाजी – दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांची मुलगी शिवानी चोपडा यांना आप उमेदवार आतिशी आणि भाजप उमेदवार धर्मबीर सिंह यांचे कडवे आव्हान मिळणार आहे.

चांदणी चौक –
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील महत्वपूर्ण असणाऱ्या चांदणी चौक मतदारसंघात काँग्रेसच्या अलका लांबा यांना आप उमेदवार प्रल्हाद सिंह साहनी आणि भाजपा उमेदवार सुमन गुप्ता यांची चांगलीच टक्कर मिळणार आहे.