दिल्लीत ज्या ठिकाणी PM मोदींनी घेतल्या सभा ‘तिथं’ झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागले असून अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार असले, तरी भाजपाला या निवडणुकीत जेमतेमच यश मिळालेले पाहायला मिळते आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतल्या तिथेच भाजपने जास्त जागा जिंकल्या आहेत . दुसरीकडे कुठेही भाजपा जागा जिंकून शकलेला नाही.

दिल्लीत आम आदमी पक्षाने भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले आहे परंतु , उत्तर दिल्लीतील एकूण सोळा विधानसभा जागांपैकी सहा जागा भाजपाने जिंकल्या असून , यामध्ये खासदार गौतम गंभीर च्या मतदार संघातील लक्ष्मीनगर, गांधीनगर आणि विश्वास नगर या तीन जागा व दिल्ली भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या मतदार संघातील घोंडा, करावल नगर आणि रोहतास नगर इथून तीन असा एकूण सहा जागांवर भाजपा विजयी झाला आहे.

लक्ष्मीनगर मधून भाजपचे अभय वर्मा , गांधीनगर मधून अनिल वाजपेयी आणि विश्वास नगरमधून ओम प्रकाश शर्मा हे उमेदवार जिंकलेले आहेत. विश्वास नगरमधून मागील वेळेस भाजपचं विजयी ठरला होता. तसेच रोहतास नगर मधून भाजपाचे जितेंद्र महाजन यांनी आमी आदमी पक्षाचे उमेदवार सरिता सिंह यांचा पराभव केला. घोंडा मधून भाजप उमेदवार अजय महावर आणि करावल नगर मधून मोहन सिंह बिष्ट पण विजयाच्या जवळ आहेत. मोहन सिंह बिष्ट हे आधी सुद्धा निवडणूक लढले असून ते विजयी सुद्धा झालेले आहेत आणि लोकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे.

खरेतर यमुनेपलीकडील लोकसभा मतदारसंघात उत्तरप्रदेश आणि बिहार मधील मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मनोज तिवारीने अधिक मतदान होणार हे निश्चित आहे आणि आम आदमी पक्षाचा जोर तिथे फारसा लागणार नाही. २०१५ च्या निवडणुकीत जेव्हा आम आदमी पक्षाला सदुसष्ठ जागा मिळाल्या होत्या तेव्हाही भाजपाने या मतदार संघातून विजय मिळवला होता. यावेळेस देखील भाजपाला इथे जास्त जागा मिळाल्या असून हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे.

या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे बोलले जात आहे , कारण त्यांनी या भागात प्रचारसभा घेतली होती त्यामुळे भाजपा या भागात जास्त जागा जिंकला आहे. या वेळी मोदींनी रोहिणी आणि शाहदरा या शहरांमध्ये मध्ये सभा घेतली होती. बाकी कोणत्याहि ठिकाणी भाजपला जास्त जागा जिंकता आलेल्या नाहीत.