दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसेनच्या ‘कॉल’ डिटेल्समुळं झाला खुलासा, CM केजरीवाल आणि सिसोदियांची देखील होऊ शकते ‘विचारपूस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसा भडकवल्याच्या आरोपाने घेरलेल्या आम आदमी पक्षाकडून निलंबित करण्यात आलेल्या ताहिर हुसेन यांच्या फोन कॉलच्या तपशिलाची चौकशी केली जात आहे. दरम्यान हिंसाचाराच्या ३ दिवसाआधी कॉल डिटेलमध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

माध्यमाच्या अहवालानुसार आम आदमी पार्टीने निलंबित केलेल्या ताहीर हुसेनच्या ३ दिवसाच्या कॉल डिटेलने समोर आले की हिंसेच्या तीन दिवसाआधी हुसेनचे सीएम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अमानतुल्ला खान यांच्याशी बोलणे झाले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमानतुल्ला खान यांच्याशी तब्बल ५६ वेळेस संवाद साधला गेला आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत १८ वेळा तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी ९ वेळा संवाद साधला गेला.

रविवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून उत्तर-पूर्व दिल्लीत सुरू झालेल्या हिंसाचारात तब्बल ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांकडून दंगलीबाबत चौकशी करण्यात येत आहे.

शनिवारी एका कचरा उचलणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीचा हिंसाचारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा ४३ वर पोहोचला. शुक्रवारी आरोग्य विभागाने आणखी चार मृत्यूची पुष्टी केली. या हिंसाचारादरम्यान इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी आणि एक दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल ठार झाले.

पोलिसांनी आतापर्यंत उत्तर-पूर्व दिल्ली हिंसाचारप्रकरणी एकूण १२३ एफआयआर नोंदवल्या आहेत आणि सुमारे ६२३ लोकांना ताब्यात घेतले आहे. तथापि, हिंसाचाराच्या ४ दिवसानंतर उत्तर-पूर्व दिल्लीतील काही दंगलग्रस्त भागात दुकाने उघडली असून तेथील परिस्थिती आता सामान्य होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like