काय सांगता ! होय, गुन्हेगारी केस नाही पण 8 वी पास ताहिर हुसेनकडं कोट्यावधीची संपत्ती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्टेलिजन्स ब्यूरो (आयबी) चे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ताहिर हुसैनवर दिल्ली पोलिसांनी केस दाखल करून तपास सुरू केला आहे. हत्या, जाळपोळ आणि हिंसाचार पसरवण्याचा आरोप असलेले नगरसेवक ताहिर हुसैन करोडपती आहेत आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे करोडीची संपत्ती आहे.

मागील उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 15 करोड रूपयांची संपत्ती आहे आणि त्यांच्याकडे एकुण 17 करोड रूपयांची रक्कम आहे. तसेच 2017 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून उमेदवारी दाखल करताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

कोणातही गुन्हा दाखल नाही

त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, ताहिर हुसैन एक व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडे 15 करोड रुपयांची स्थायी संपत्ती आहे. ते शाहदरातील व्यावसायिक इमारतींचे मालक आहेत. त्यांची अस्थायी संपत्ती 1.75 करोड रूपये आहे. तसेच विविध बँकेत त्यांची 6 बँक खाती आहेत. त्यांनी 3 कंपन्यांच्या शेयरमध्ये गुंतवणूक केली आहे.

करोडपती असूनसुद्धा ताहिर हुसैन यांच्याकडे एक मारुती ओमनी (2012 मॉडल) आणि एक मोटरसाकल आहे. त्यांनी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. शपथपत्रात घोषित केल्याप्रमाणे त्यांची एकुण संपत्ती 17.78 करोड रुपये आहे.

या आठवड्यात नॉर्थ-ईस्ट दिल्लीत झालेल्या दंगलीत आयबीचे कर्मचारी अंकित शर्मा यांची झालेली हत्या आणि हिंसाचाराच्या प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. तसेच ताहिर हुसैन यांच्याविरूद्ध दिल्ली पोलीस तपास करत आहेत. ताहिर हुसैन यांची दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना कोणतीही गुन्हेगारी स्वरूपाची नोंद नव्हती.

8वीपर्यंत शिकले आहेत ताहिर हुसैन

त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ताहिर हुसैन यांनी केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. दरम्यान, फॉरेन्सिकच्या एका टीमने शुक्रवारी अंकित शर्मांची ज्याठिकाणी हत्या झाली तेथे जाऊन पुरावे गोळा केले आहेत.

सूत्रांचे म्हणणे आहे की, फॉरेन्सिक टीमने अंकित यांच्या हत्येसंदर्भात अनेक महत्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. अंकित यांच्या हत्येशिवाय पोलिसांनी ताहिर यांच्या घराच्या छप्परावरून पेट्रोल बॉम्ब, अ‍ॅसिड, दगड आणि वीटा जप्त केल्या.

चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते ताहिरला

सूत्रांच्या माहितीनुसार, अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी लवकरच ताहिर हुसैन यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. दरम्यान, ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचा दावा आहे की, हिंसाचारा दरम्यान आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी पोलिसांना दोन वेळा फोन केला होता.

दिल्ली हिंसाचारात नाव समोर आल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तपास पूर्ण होईपर्यंत ताहिर हुसैन यांना पक्षातून निलंबित केले आहे.