Delhi violence: … तर आम्ही देखील मेलो असतो, दिल्ली हिंसाचारात जखमी झालेल्या ACP नं सांगितली ‘आपबीती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचारादरम्यान जखमी झालेले पोलीस अधिकारी गोकुळपुरीचे एसीपी अनुज कुमार आता आयसीयूमधून बाहेर आले आहेत. अजुन कुमार यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. दिल्ली हिंसाचारात शहीद झालेले रतन लाल देखील त्यांच्यासोबत होते. ते म्हणाले, पहिल्यांदा वाटले की रतन लाल यांना दगड लागला परंतु त्यानंतर लक्षात आले की त्यांना गोळी लागली होती. डीसीपी शाहदरा अमित रस्त्यावर बेशुद्ध पडले होते, त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. त्यांना उचलेले परंतु त्यांच्या डोक्यात हेल्मेट अडकले होते.

एसीपी अनुज 24 फेब्रुवारीला चांद बागमध्ये उपस्थित होते. याच दरम्यान येथे हिंसा भडकली होती. अनुज कुमार यांच्यासोबत डीसीपी अमित शर्मा देखील उपस्थित होती, जे अद्यापही रुग्णालयात आहे. त्यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल रतनलाल देखील होते. जे हिंसक जमावाला रोखत होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

24 तारखेला 11 वाजता घडली घटना –
एसीपी अनुज म्हणाले की, 24 तारखेला सकाळी 11 ते 11.30 दरम्यान ही घटना घडली. ते म्हणाले तेव्हा डीसीपी अमित शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल रतनलाल चांदबाग मजारपासून 80 – 100 मीटर पुढे तैनात होते.

23 तारखेला आंदोलनकर्त्यांनी वजीराबाद रोड जाम केला होता, जो रात्री सुरु करण्यात आला. पोलिसांनी निर्देश होते की तो रस्ता क्लिअर ठेवायचा आहे. आंदोलनकर्त्यांना सर्विस रोडपर्यंत अडवून धरायचे होते. त्यामुळे तेथे सुरक्षा दल, अधिकारी तैनात होते.

महिलांसोबत जमा झाले आंदोनलकर्ते –
दगडफेक होण्यास सुरुवात झाली तेव्हा अनेक लोक जमा झाले, त्यात महिला देखील होत्या, त्या पुढे होत्या. त्यांना सर्विस रोडच्या पुढे येऊ नये असे समजवले जात होते. परंतु जमाव ऐकन्याच्या परिस्थितीत नव्हता. महिला पोलीस त्या महिला आंदोनकांना मागे सारत होत्या.

पोलीस गोळीबार करत असल्याची अफवा पसरली –
एसीपी अनुज म्हणाले, काही लोकांनी अफवा पसरवली की पोलिसांनी गोळीबार केला आहे. ज्यात महिला, लहान मुले मारल्या गेले. याची माहिती मला नंतर मिळाली, त्यामुळे लोक आणखी संतप्त झाले. एसीपी म्हणाले की पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये 12 ते 15 मीटरचे अंतर होते.

रस्त्यावर पडले होते डीसीपी –
एसीपी म्हणाले की, सर्विस रोडचे काम सुरु होते त्यामुळे तेथे भरेच दगड वैगरे पडला होते, लोकांकडे फावडे, कुदळी देखील दिसल्या. त्यानंतर दगडफेक सुरु झाली. परंतु अंतर कमी होते त्यामुळे अश्रू धूराचा मारा प्रभावी ठरला नाही. त्यानंतर गोंधळ थोडा फार शांत झाल्यानंतर माझी नजर डीसीपींकडे गेली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. तोंडातून देखील रक्त वाहत होते, ते बेशुद्ध होते. त्यानंतर डोक्यात आले की त्यांना येथून पहिल्यांदा हलवले पाहिजे. जमाव उग्र झाला होता. आम्ही यमुना विहारच्या दिशेने पळालो. सरळ गेलो असतो तर दोन्हीकडून जमाव येत होता. सरांसोबत एक कमांडर आणि एक कॉन्स्टेबल देखील होते. जर आम्ही सरळ गेलो असतो तर आम्हाला देखील मारहाण झाली असती.

दिल्लीत हिंसेनंतर आता शांती आहे, पोलीस लोकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. लोक घरातून बाहेर पडत आहेत. गाड्या पण रस्त्यावर उतरल्या आहेत. पोलीस म्हणाले की लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like