दिल्ली हिंसाचारावरून भाजपाच्या मित्र पक्षानेच केली BJP वर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये सीएएवरून आंदोलनं करण्यात येत आहे. या आंदोलनानाल हिंसकवळण लागल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दिल्लीतल्या हिंसाचारावर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलानं मोठं विधान केलं आहे. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी धर्मनिरपेक्षता समाजवाद आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिल्लीत होत असलेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शांततेत जगणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या देशाच्या संविधानात तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. ज्यात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीचा समावेश आहे. या ठिकाणी धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद नाही. श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे तर गरीब गरीब होत चालला आहे. लोकशाहीतसुद्धा दोनच स्तर शिल्लक राहिले आहेत. एक लोकसभा आणि दुसरी विधानसभा.

अल्पसंख्याकांना लक्ष करणं दुर्दैवी
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा मुलगा आणि अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्ली पोलिसांच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रत्येक वेळी अल्पसंख्याकांना हिंसेत लक्ष करणं हे दुर्दैवी आहे. 1984 ची परिस्थिती मला पुन्हा पहायची नाही.

त्यावेळी शीख होते आता मुसलमान आहेत. प्रत्येक वेळी अल्पसंख्याक समाजावर हल्ले केले जातात. 1984 मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या होत्या त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता.