IB कॉन्स्टेबल अंकित शर्माच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपये अन् परिवारातील सदस्याला सरकारी नोकरी, CM केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यासह, दिल्ली सरकार शर्मा यांच्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी लिहिले कि, “अंकित शर्मा आयबीचे शूर अधिकारी होते. दंगलीत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. देशाला त्यांच्यावर अभिमान आहे. दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे की, त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी मानधन मिळेल आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देईल. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो.’

दरम्यान, ईशान्य दिल्लीतील दंगलीत दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 230 हून अधिक एफआयआर नोंदवले आहेत. त्याचवेळी आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक लोकांचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाला आहे. हिंसाचाराच्या वेळी गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून आतापर्यंत 150 हून अधिक लोकांना अटक करण्यात आले आहे.

अफवांवरही कारवाई केली :
रविवारी दिल्लीत दंगलीच्या अफवा पसरल्या होत्या. रोहिणी जिल्ह्यात अफवा पसरविल्याप्रकरणी विकास नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने ए ब्लॉक रामा विहारवर गोळीबार झाल्याचा खोटा फोन केला होता. या व्यतिरिक्त आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुनीत (22) वर्षे ज्याने रोहिणी परिसरात मुले अडकल्याचा खोटा फोन केला. रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन 65 डीपी अ‍ॅक्टची चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले. शिवम नंदन (22) सेक्टर तीनमध्ये गोळीबार झाल्याचा खोटा फोन केला होता. त्यालादेखील ताब्यात घेऊन चौकशी केली होती. चौकशी केल्यांनतर असता बाईकच्या सायलेन्सरचा आवाज असल्याचे निदर्शनास आले. तसेच बुध विहारमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला असून, त्यामध्ये हिंसाचाराचे खोटे कॉल करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.