Delhi Violence : दिल्ली हिंसाचाराचं धक्कादायक वास्तव ! दगडफेकीत 22 जणांचा ‘मृत्यू’ तर 13 लोक बंदुकीच्या गोळीचे ‘शिकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून उत्तर पूर्व दिल्ली हिंसाचाराने आणि जाळपोळीने पेटली होती, त्यात 22 लोकांचा दगडफेकीत मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी हिंसेची शिकार झालेल्या आणि मृत लोकांपैकी 35 जणांची ओळख पटवली आहे, ज्यातील 22 जणांचा दगडफेकीत जीव गेला तर 13 लोकांचा गोळ्या लागून मृत्यू झाला.

पोलिसांनी शुक्रवारी उत्तर पूर्व दिल्लीत हिंसाचारात 35 लोकांचा जीव जाण्याच्या कारणांचा खुसाला केला आणि त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले. 35 पैकी 22 लोकांचा दगडफेकीत दगड लागल्याने आणि त्यांच्यावर झालेल्या शारीरिक हल्ल्याने मृत्यू झाला तर 13 लोकांचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.

पोलिसांच्या अहवालानुसार, मंगळवारपर्यंत 35 लोक हिंसेचे शिकार झाले. गोळी लागल्याने 13 लोकांचा तर 22 लोकांचा हिंसाचारात जखमी झाल्याने मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ता म्हणाले, या हिंसेत मारल्या गेलेल्या लोकांचे वय 20 ते 30 दरम्यान आहे. तर रुग्णालयातील अधिकारी मृत झालेल्या लोकांची संख्या 41 सांगत आहेत.

हल्ल्यात किंवा दगडफेकीत मृत झालेल्या लोकांची संख्या –
1. आलोक तिवारी (वय – 32 – शारीरिक हल्ला)
2. मोहसिन (वय – 25 – शरीरिक हल्ला)
3. सलमान (वय – 24 – दगडफेकीत मृत्यू)
4. आयबी कर्मचारी अंकित शर्मा (वय – 26 – शारीरिक हल्ला)
5. असफाक हुसैन (शारीरिक हल्ला)
6. दिलबर सिंह नेगी (वय – 21 – शारीरिक हल्ला)
7. महरुफ अली (वय – 32 – शारीरिक हल्ला)
8. मेहताब (वय – 22 – शारीरिक हल्ला)
9. जाकिर ( वय – 24 – शारीरिक हल्ला)
10. दीपक कुमार (वय – 34 – चाकू हल्ला)

गोळीबार मृत्य झालेल्यांची नावे –
1. अमन (वय – 18)
2. दिनेश (वय – 35)
3. हेड कांस्टेबल रतन लाल (वय – 42)
4. इस्तयाक (वय -24)
5. मोहम्मद मुबारक हुसैन (वय – 28)
6. मोहम्मद मुदस्सर (वय – 30)
7. प्रवेश (वय – 48)
8. राहुल सोलंकी (वय – 26)
9. वीर भान (वय – 50)
10. मोहम्मद फुरकान (वय – 30)
11. शाद मोहम्मद (वय – 35)