दिल्ली हिंसाचार : पोलिसांना ‘आदेश’ – ‘दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घाला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत सीएएवरून सलग दिसऱ्या दिवशी हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत 13 जणांचा बळी गेलाय. तर जवळपास 150 जण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिलीय. दरम्यान दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बैठक झाली. या बैठकीत लष्कराला पाचारण करण्याची मागणी केली. मात्र गृहमंत्रालयाने याला नकार दिला. दरम्यान, दिल्लीतील यमुना विहारमध्ये दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दिल्लीत चार ठिकाणी कर्फ्यू
दिल्लीतील मौजपुर, जाफराबाद, चांदबाग आणि करावल या भागात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की दिल्लीमध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान हिंसाचारग्रस्त भागातील शाळा, कॉलेजेस उद्या बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच उद्या होणाऱ्या परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोठी बैठक घेतली. अहमदाबादहून परतल्यानंतर लवकरच अमित शहा यांनी आढावा बैठक घेतली. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत गृहसचिव, इंटेलिजन्स ब्युरो चीफ, दिल्ली पोलिस आयुक्त आणि गृह मंत्रालयाचे अन्य अधिकारी सहभागी होते. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like