दिल्ली हिंसाचारात ‘देवदूत’ बनला भाजपाचा ‘हा’ नगरसेवक, अर्ध्यारात्री भडकलेल्या जमावापासून वाचवले मुस्लिम परिवाराचे ‘प्राण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन दिल्लीत हिंसा भडकली असताना दुसरीकडे भाजपच्या एका नगरसेवकांने हिंसक जमावाच्या कचाट्यातून एका मुस्लिम कुटूंबाला आणि त्यांच्या घराला वाचवून माणूसकीचे दर्शन घडवून दिले. हिसेंदरम्यान दिल्लीच्या यमुना विहारमधील भाजपचे नगरसेवक प्रमोद गुप्ता यांनी मुस्लिम व्यक्ती असलेल्या शाहीद सिद्दीकी यांच्या कुटूंबाची मदत केली आणि तब्बल 150 लोकांच्या हिंसक जमावापासून त्यांचे घर पेटवता पेटवता वाचले. सीएए हिंसाचारात उत्तर दिल्लीत आतापर्यंत 7 लोकांचा जीव गेला आहे.

शाहिद सिद्दीकी माध्यमांशी बोलताना म्हणाले, जमाव अचानक घोषणाबाजी करत शेजारच्यांच्या दिशेने पुढे जाऊ लागले. जमावाने तेथून आत प्रवेश केला जेथून पोलिसांनी बॅरिकेडिंग लावली नव्हती आणि तो रस्ता मुस्लिम बहुल परिसरातून जात होता. सिद्दीकी म्हणाले, घटना जवळपास 11.30 वाजेदरम्यान घडली. सिद्दीकी म्हणाले की जमावाने पहिल्यांदा त्यांच्या घराखालील बुटीक पेटवले, जे त्यांच्या भाडेकरुंचे होते. त्यानंतर त्यांच्या कुटूंबाची एक कार आणि दुचाकी देखील पेटवून दिली.

शाहिद सिद्दीकी म्हणाले, जमावाने आमच्या गॅरेजमधून आमची कार आणि दुचाकी बाहेर काढली आणि त्या पेटवून दिल्या. त्यांनी आमच्या भाडेकऱ्यांचे बुटीक देखील जाळले. त्यामुळे जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाले.

परंतु या दरम्यान तेथे भाजप नगरसेवक प्रमोद गुप्ता दाखल झाले जे सिद्दीकी यांचे मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या कुटूंबाला वाचवले आणि जमावाला त्यांचे आणि त्यांच्या संपत्तीचे नुकसान करण्यापासून रोखले. हिंसक जमावापासून सिद्दीकी आपल्या कुटूंबाला बऱ्याच प्रयत्नानंतर वाचवू शकले. त्यांच्या कुटूंबात 2 महिन्यांचं एक मुलं देखील होते. सिद्दीकी म्हणाले की जसे आम्हाला काही तरी विघटीत घडणार याची जाणीव झाली आणि आमच्या कुटूंबासोबत तेथून पळालो आणि नंतर कळाले की भाजप नगरसेवक प्रमोद गुप्ता तेथे आले आणि त्यांनी आमच्या घराला आग लावण्यापासून हिंसक जमावाला रोखले.

सोमवारी सीएए विरोधक आणि समर्थक उत्तर दिल्लीत जाफराबाद, मौजपूर परिसरात एकमेंकात भिडले. ज्यात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 150 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. सोमवारी झालेल्या हिंसेत अनेक गाड्यांची, दुकानांची जाळपोळ करण्यात आली.

काय झालं होतं रविवारी की हिंसा भडकली –
सीएए कायद्या विरोधात मोठ्या संख्येने आंदोलन करणाऱ्या लोकांनी रविवारी रस्ता अडवला ज्यानंतर जाफराबादमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकात हिंसा भडकली. दिल्लीतील अन्य भागात देखील धरणं आंदोलनं सुरु झाली. मौजपूरमध्ये भाजप नेता कपिल मिश्रा यांनी एक सभा बोलावली आणि मागणी केली की पोलिसांनी तीन दिवसांच्या आत सीएए विरोधी आंदोलकांना हटवावे. त्यानंतर काही वेळातच दोन्ही समूहांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली ज्यामुळे पोलिसांना अश्रू धुराचा मारा देखील करावा लागला होता.

You might also like