‘सेक्स रॅकेट’ची ‘या’ अ‍ॅपव्दारे जाहिरात, महिला आयोगाकडून बंदीसाठी ‘कडक’ पाऊल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा महिला आयोगाची दखल घेतली आहे. या वेळी हे प्रकरण मोबाइल आणि त्यावरील अ‍ॅपशी संबंधित आहे. दिल्ली महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, लोकेटो नावाचे अ‍ॅप वेश्या व्यवसायाला चालना देत आहे आणि हे बंद करण्याबाबत दिल्ली पोलिस आणि दूरसंचार मंत्रालयालाही नोटीस बजावण्यात आली आहे. महिला आयोगाने नोटीसमध्ये म्हटले आहे की, लोकेटो सारख्या मोबाईल अ‍ॅपचा समाजात नकारात्मक परिणाम होत असल्याने त्वरित बंद करण्याची आवश्यकता आहे. आयोगाने दिल्ली पोलिसांना याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यास सांगितले.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत अधिक माहित दिली. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. या मोबाइल अ‍ॅपद्वारे एस्कॉर्ट सर्व्हिसेस, स्ट्रिपर्स, कॉल गर्ल्स इत्यादी सेवा देण्यासाठी खुलेपणाने जाहिराती दिल्या जात आहेत.

नोटीसमध्ये महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणी त्वरित एफआयआर नोंदविण्यात यावा आणि तपास अहवालासह आरोपींच्या अटकेची माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. या आधी अशी अन्य मोबाईल अ‍ॅप्स आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्स सापडली गेली आहेत का ? तसे असल्यास त्यांच्याविरोधात काय कारवाई केली गेली आहे ?असा सवाल आयोगाने विचारले आहे. स्वाती मालीवाल यांनी दूरध्वनी मंत्रालयाकडे त्वरित हे अ‍ॅप ब्लॉक करुन अशा इतर अ‍ॅप्सवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –