प्राणी संग्रहालयात तरूण सिंहाला ‘बिलगला’, पुढं झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात एक तरुणाने सिंह असलेल्या पिंजऱ्यात उडी मारली आणि फिरायला आलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली. परंतू हैराण करणारी बाब म्हणजे त्या सिंहाने तरुणाला काहीही केले नाही, त्यानंतर तरुण पिंजऱ्यातून परत बाहेर पडला.

घटनेदरम्यान तरुणांला उपस्थित लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतू तरुणाने कोणाचेही न ऐकता सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली आणि या दरम्यान सिंह आणि तरुणात सामना देखील झाला. परंतू प्रकरण येथेच थांबले नाही त्यानंतर तरुण सिंहासमोर जाऊन बसला.

घटनेदरम्यान तरुण बराच वेळ सिंहाजवळ बसला, परंतू सिंहाने तरुणाला काहीही केले नाही. या प्रकारादरम्यान सुरक्षा कर्मचारी पिंजऱ्यात गेले आणि तरुणाचा जीव वाचवला. तरुण मानसिकदृष्या आजारी आहे. घटनेनंतर तरुणाला पोलीस ठाण्यात नेले, तेथे त्यांची चौकशी करण्यात आली.

या घटनेसंबंधित डीसीपीने सांगितले की तरुणाचे नाव रिहान खान आहे, तो 28 वर्षांचा आहे. तसेच तो बिहारचा रहिवासी आहे. परंतू मानसिकदृष्ट्या आजारी आहे. असे सांगण्यात आले की हा तरुण बऱ्याच काळापासून सीलमपूरमध्ये राहतो, त्याला वाचवण्यासाठी प्राणी संग्राहलय प्रशासानच्या 4 गटांकडून प्रयत्न करण्यात आले, त्यानंतर त्याला वाचवण्यात आले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी