दिल्लीच्या सर्वात मोठ्या ‘डॉन’चा ‘एन्काऊंटर’मध्ये ‘खात्मा’, शिल्पा शेट्टीच्या पतीला लुटलं होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मेरठच्या कंकरखेडामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी दिवसाढवळ्या एका एन्काउंटरमध्ये सर्वात मोठा डॉन शिव शक्ती नायडू यास ठार केले. कंकरखेडा मध्ये गोळीबाराच्या आवाजाने सगळीकडे अफरातफरी माजली होती.

खरंतर हा गोळीबार पोलीस आणि दरोडेखोर यांच्या चकमकीत होत होता. अर्धा तास चालणाऱ्या या गोळीबारात पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर शिव शक्ती नायडू यास ठार केले. नायडूवर पोलिसांनी एक लाख रुपयांचा इनाम देखील ठेवला होता.

पोलिसांनी नायडूच्या एन्काउंटर नंतर तेथून कार्बाईन, एक डबल बॅरल बंदूक, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि एक लूटलेली फॉर्च्युनर एसयूव्ही कार जप्त केली. जी त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली-देहरादून हायवे वरून लुटली होती. दरम्यान कंकरखेडा पोलिस स्टेशन परिसरातील वैष्णो धाममध्ये पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले होते.

एडीजी मेरठ झोन प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कंकरखेडा येथे नायडू यांचे स्थान मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. घरात लपून बसलेल्या नायडूला पोलीस येण्याची बातमी समजताच त्याने आतून पोलिसांवर गोळीबार सुरू झाला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले आणि जेव्हा खोलीतून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज थांबला, तेव्हा टीम आत गेली. आत नायडू जखमी अवस्थेत पडला होता ज्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

एन्काउंटरच्या दरम्यान काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. या चकमकीत सीओ जितेंद्र सरगम दरोडेखोरांच्या गोळीने जखमी झाले. सांगण्यात येत आहे की एसएसपी यांच्या बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये देखील गोळ्या लागल्या होत्या, परंतु त्यांना काही नुकसान झाले नाही.

या खळबळजनक चकमकीसंदर्भात मेरठच्या एसएसपीने सांगितले की नायडूने १५ दिवसांपूर्वी आपला जोडीदार, तिलकराज आणि त्याचा पुतण्या हनीवर हल्ला केला होता ज्यामध्ये हनीचा मृत्यू झाला. यानंतर त्याचा सहयोगी तिलकराज याने दावा केला होता की नायडू दिल्लीचे एसीपी मोहन नेगी आणि मेरठचे निरीक्षक विपन कुमार यांच्या हत्येचा कट रचत होता.

पोलिसांनी सांगितले की, नायडूने तिलकराज, हनी सहित १४ दरोडेखोरांना सोबत घेऊन २८ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील चित्रपट उद्योगपती राज कुंद्रा यांच्याकडून ७ कोटी ८० लाखांची लूट केली. या प्रकरणात शक्ती नायडू, तिलकराज आणि हनी यांना दिल्ली स्पेशल सेलने अटक केली होती. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्याकडून दिल्लीतील लाजपत नगरयेथे सुमारे ८ कोटी रुपये लुटले गेले.

एसीपी यांच्या म्हणण्यानुसार, स्पेसल सेलचे एसीपी ललित मोहन यांनी नायडूवर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट (मकोका) लादले होते. त्यामुळे तो त्यांच्या जीवाचा शत्रू बनला होता.

मेरठ पोलिसांनी दावा केला आहे की, तपासात समोर आले होते की दिल्ली पोलिसांचा एक शिपाई त्यांना मदत करत होता. तो शस्त्रे आणि सोबती तयार करण्यापासून त्यांना शरण जाण्याचे नियोजन करण्यात मदत करायचा.

एसएसपी यांनी सांगितले की नायडू ६ वर्ष कारागृहात होता आणि सध्या तो पॅरोलवर कारागृहातून बाहेर पडल्यावर फरार झाला होता. नायडू वादग्रस्त मालमत्ता वर कब्जा करून त्याची विक्री करण्याचा धंदा करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहार तुरुंगात ६ वर्षे राहिल्यानंतरच त्याने आपली टोळी तयार केली होती.

जुलै २०१९ मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर नायडूने ६ महिन्यांतच दिल्ली आणि पश्चिम उत्तरप्रदेश मध्ये आपले नेटवर्क पसरवले होते. नायडूची आधीपासूनच दिल्लीमध्ये दहशत होती आणि त्याचा फायदा घेत त्याने पंजाब, राजस्थान, हरियाणा, यूपी मधील लूटमार आणि दरोडे टाकणाऱ्या गुंडांना आपल्या टोळीत सामील करून घेतले आणि अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्यास सुरवात केली.