Lockdown पासून बंद होता सिनेमा हॉल, आतमध्ये मिळाला फासावर लटकलेला गार्डचा मृतदेह

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या आसफ अली रोडवरील डिलाईट सिनेमा हॉलमध्ये एका युवकाचा फासावर लटकलेला मृतदेह मिळून आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

डिलाईट सिनेमा हॉलमध्ये संजय कुमार गार्डचे काम करत होता. रविवारी संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह सिनेमा हॉलच्या आत फासावर लटकलेल्या आवस्थेत मिळून आला. मिळालेल्या महितीनुसार लॉकडाऊनदरम्यान संजय डिलाइट हॉलच्या मालकाच्या घरी कार्यरत होता. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली.

संजयच्या कुटुंबियांनी खुनाचा आरोप करत म्हटले की, संजयची हत्या करून त्याचा मृतदेह सिनेमा हॉलमध्ये लटकवण्यात आला आहे. तर, पोलिसांच्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून सिनेमा हॉल बंद असल्याने संजय अस्वस्थ होता. पोलिस अनेक दृष्टीकोनातून तपास करत आहे.

लॉकडाऊनच्या प्रतिबंधात शिथिलता आणली जात आहे, परंतु सिनेमा हॉल उघडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. सिनेमा हॉल अजूनही बंद आहेत.