‘अंतराळा’तून येतेय डिलिव्हरी, 30 कोटी KM अंतरावरुन जपानी यान आणतेय अ‍ॅस्टेरॉइडची ‘धूळ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतराळातून एक स्पेशल डिलिव्हरी पृथ्वीसाठी येत आहे. जपानचे हयाबुसा -2 अंतराळ यान या डिलिव्हरीसह येत आहे. ही डिलिव्हरी आहे 30 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लघुग्रहाच्या धुळीची. जपानचे अंतराळयान धूळ घेऊन पृथ्वीवर परत येत आहे. जपान या मोहिमेमध्ये यशस्वी झाल्यास तो चीनपेक्षा मोठे काम करेल. कारण खूप वेगाने उडणाऱ्या लघुग्रहाच्या पृष्ठभागावरून धूळ आणणे हा विज्ञानाच्या जगामध्ये एक मोठा पराक्रम आहे.

जपानचे अंतराळ यान हयाबुसा -2 (Hayabusa-2) हे फ्रिजच्या आकाराचे आहे. हे डिसेंबर 2014 मध्ये लाँच केले गेले होते. याने पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या अ‍ॅस्टेरॉइड रीयूगू (Asteroid Ryugu) वरून धूळ उचलली आहे. या लघुग्रहाला जपानी भाषेत ड्रॅगन पॅलेस (Dragon Palace) म्हणूनही ओळखले जाते. या लघुग्रहावर उतरणे आणि तेथून धूळ उचलणे हा एक मोठा वैज्ञानिक चमत्कार असल्यासारखेच आहे. अ‍ॅस्टेरॉइड रीयूगू पृथ्वीवर परतल्यावर जपानचे हयाबुसा-2 या अंतराळ यानला आणखी दोन लघुग्रहांच्या प्रवासासाठी निघायचे आहे. जपानची अंतराळ संस्था जाक्सा (JAXA) ने याबाबत नियोजन केले आहे. हयाबुसा-2 पुढील दहा वर्षांसाठी या दोन लघुग्रहांच्या प्रवासावर असेल.

जपानमधील शास्त्रज्ञांची अशी अपेक्षा आहे की हयाबुसा-2 (Hayabusa-2) च्या कॅप्सूलमध्ये लघुग्रहाची सुमारे 0.1 ग्रॅम धूळ असेल. जी पृथ्वीवरील संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. या धुळीपासून हे समजेल की जेव्हा 460 कोटी वर्षांपूर्वी आपले सौरमंडळ बनले तेव्हा ते कसे होते. तसेच हे देखील कळेल की या लघुग्रहांचा उगम सौर यंत्रणेत कसा झाला. त्यांचा पृथ्वीशी काही संबंध आहे की नाही. ज्या कॅप्सूलमध्ये अ‍ॅस्टेरॉइड रीयूगूची धूळ आहे ते हयाबुसा-2 अंतराळ यानापासून वेगळे होत पृथ्वीच्या दिशेने येईल. हे कॅप्सूल पृथ्वीपासून जवळपास 2.20 लाख किलोमीटरच्या अंतरावर हयाबुसा-2 पासून विभक्त होईल आणि त्यानंतर पृथ्वीकडे आपला प्रवास स्वतः करेल.

हयाबुसा-2 च्या मिशनचे मॅनेजर माकोतो योशिकावा यांनी माध्यमांना सांगितले की, मागील वर्ष आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. आमच्या यानने अ‍ॅस्टेरॉइड रीयूगूच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग केली. यानंतर तेथे इम्पॅक्टरवर फायरिंग करून धूळ उडवली आणि ती कॅप्सूलमध्ये जमा केली. त्यानंतर ते तेथून पृथ्वीकडे निघाले. माकोतो योशिकावा यांनी सांगितले की या धूळ कणांद्वारे आपण सौर यंत्रणेच्या व ग्रहांच्या उत्पत्तीशी संबंधित माहिती मिळवू शकतो. आम्हाला जेवढी धूळ मिळेल त्यापैकी अर्धी जपान आणि अमेरिका ठेवेल, त्यानंतर उर्वरित हिस्सा आंतरराष्ट्रीय संस्थांना संशोधनासाठी देण्यात येईल. जेणेकरून भविष्यातील अभ्यासास मदत होईल.

कॅप्सूल सोडल्यानंतर पुढील सहा वर्षांपर्यंत हयाबुसा-2 सूर्याच्या कक्षेत चक्कर मारत अवकाशातील धुळीचा आणि इतर ग्रहांचा अभ्यास करेल. यानंतर ते जुलै 2026 मध्ये आपल्या पहिल्या लघुग्रहावर पोहोचेल. या लघुग्रहाचे नाव आहे 2001 CC21. हयाबुसा-2 त्याची छायाचित्रे घेईल. हयाबुसा-2 यानंतर जुलै 2031 मध्ये अ‍ॅस्टेरॉइड 1998KY26 पर्यंत पोहोचेल. त्याचा व्यास 30 मीटर आहे. हे अ‍ॅस्टेरॉइड पृथ्वीपासून त्यावेळी 30 कोटी किलोमीटरच्या अंतरावर असेल. हयाबुसा-2 त्याचे देखील फोटो काढून आपल्याला पाठवेल. कारण यानंतर जपानी अंतराळ यानात इतके इंधन उरणार नाही की ते पृथ्वीवर परत येऊ शकेल.

जाक्साच्या शास्त्रज्ञांनी हयाबुसा-2 उतरण्याची तारीख आणि वेळ तर जाहीर केलेली नाही, परंतु ते कोठे उतरेल हे निश्चितपणे सांगितले आहे. जपानच्या वैज्ञानिकांना अशी आशा आहे की ते ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या मैदानी भागात उतरेल. कॅप्सूलचे वजन 16 किलो आहे. उंची 200 मिलिमीटर आहे तर व्यास 400 मिलिमीटर इतका आहे. त्यात एक पॅराशूट देखील आहे जे पृथ्वीवर पडण्यापूर्वी उघडेल.

You might also like