Delta Plus Variant | पुणे शहरात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा पहिला रूग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असताच नव्याने जन्म घेतलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta Plus variant) संख्या आता हळूहळू राज्यात वाढताना दिसत आहे. राज्यात साधारण 66 रूग्ण सापडले आहे. त्यापैकी 5 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आजतागायत डेल्टा प्लस व्हेरीयंटचे (Delta Plus variant) एकूण 6 रूग्ण (6 patients) सापडले आहेत. त्यामधील पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. याबाबत माहिती महापालिकेचे (Pune Corporation) सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjeev Wavare) यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेचे (Pune Corporation) सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjeev Wavare) यांनी सांगितले आहे की, ‘पुणे शहरात सापडलेला डेल्टा प्लसचा (Delta Plus variant) रुग्णाला महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता त्याची प्रकृती स्थिर असून, नागरिकांनीही विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. कोविड संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचं वावरे यांनी सांगितलं आहे.

आरोग्य विभागाच्या (Department of Health) माहितीनुसार, ‘पुणे शहरात आढळलेला रुग्णाला कोणतेही लक्षणे नसून, त्याला 16 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही. दरम्यान, त्या रुग्णाची प्रकृतीही स्थिर आहे. तसेच, नुकतंच पुणे शहरात (Pune) कोरोना बाबत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, डेल्टा प्लस व्हेरीयंटचा (Delta Plus variant) रूग्ण आढळल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रात 66 रुग्णांपैकी सर्वाधिक 13 रुग्ण एकट्या जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यापैकी दहा रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

या दरम्यान, ‘जीवनक्रमाच्या भाग म्हणजे जनुकीय बदल करत राहणे आहे.
म्हणून त्याचे व्हेरीयंट (Delta Plus Variant) येतच राहणार.
केवळ आपण त्यातले किती शोधतो हा सवाल आहे. या अगोदर जो देश असे नवे व्हेरियंट शोधेल त्या देशाचे नाव त्या व्हेरियंटला दिले जायचे.
अर्थात युके व्हेरीयंट, दक्षिण आफ्रिका व्हेरीयंट असे.
मात्र, या वनावावरून देशाची बदनामी व्हायला लागली, यामुळे आता अल्फा, डेल्टा यासारखी ग्रीक अक्षरांचे नाव दिले जाते.

Web Title :-  Delta Plus Variant | found first delta plus patient in pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Zika Virus | पुण्यात झिका संसर्गाचा धोका; 4 महिने गर्भधारणा टाळण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला

Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला ‘लाचलुचपत’चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद

Rain in Maharashtra | राज्यात ‘या’ तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार