Delta Plus Variant | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’ची तिसरी लाट? 386 मुले ‘कोरोना’बाधित

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Delta Plus Variant | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) रुग्णांची संख्या वेगाने वाढली. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (Delta Plus variant) सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. यामुळे राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका ( Maharashtra Coronavirus Third Wave) असल्याचे सांगण्यात आले आहे. डेल्टा प्लसचे (Delta Plus variant) सर्वाधिक रुग्ण राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri district) आहेत. कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यात 386 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. (386 children in ratnagiri district affected coronavirus)

14 वर्षाखालील मुलांना कोरोनाची बाधा (Corona in children under 14 years of age)

रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri district) आढळून आलेले सर्व 386 मुले ही 14 वर्षाखालील आहेत. कोरोना (Corona) बाधितांचे प्रमाण 6.96 टक्के इतकं आहे. बाधित मुलांमध्ये कोणतीच लक्षणे (Symptoms) दिसून येत नाहीत. केवळ ट्रेसिंगमध्ये (tracing) किंवा संपर्कात (contact) आल्यामुळे त्यांना कोरोनाची (Corona) बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही जिल्ह्याची आकडेवारी या महिन्यातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील (ratnagiri district) खेड तालुक्यात (Khed Taluka) 226 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सध्या 40 ॲक्टिव्ह (Active) आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Coronavirus Third Wave) पार्श्वभूमीवर ही चिंतेची बाब आहे.

ग्रामीण भागात तपासणी सुरु (Testing started in rural areas)

रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri district) मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची (coronavirus) बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने (District Administration) ग्रामीण भागात (Rural Area) मोठ्या प्रमाणावर तपासणी (Checking) सुरु केली आहे. या तपासणीमध्ये घरातील मोठ्यांबरोबर लहान मुलांची देखील तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे लहान बालकेही यामध्ये कोरोना बाधित आढळून येत आहेत. या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

खेड तालुक्यात 27 मुले कोरोनाबाधित (27 children become corona positive in Khed taluka)

रत्नागिरी जिल्ह्यातील (ratnagiri district) एकट्या खेड तालुक्यात (Khed Taluka) 27 मुले कोरोनाबाधित आढळून आली आहेत. ही सर्व मुले 14 वर्षाखालील वयोगटातील आहेत. यामध्ये 6 मुले ही गृह विलगीकरणात (home quarantine) आहेत. तर 21 मुलं विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतची मुलं कोरोना बाधित झाली आहेत. या मुलांना कोरोनाची लक्षणे (Corona symptoms) नसताना ते तपासणीत कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Delta Plus Variant | maharashtra third wave 386 children in ratnagiri district affected corona

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट

Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात