Delta Plus Variant | ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे पुन्हा निर्बंध ! मुंबईसह 33 जिल्ह्यात स्तर 3 चे नियम; एक, दोन स्तरामुळे मिळणारी सवलत रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Delta Plus Variant | राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (Delta Plus Variant) व्हेरिएंटने शिकराव केला आहे. तसेच कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेट  नुसार (Corona positivity rate) निश्चित केलेले एक आणि दोन स्तर रद्द करून केवळ 3, 4, 5 असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे 33 जिल्ह्यांत स्तर 3 चे निर्बंध लागू केले आहे. आतापर्यंत एक आणि दोन स्तरांत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध राहतील. गेल्या आठवड्यात राज्यातील 25 जिल्हे हे स्तर 1 मध्ये होते. याशिवाय 8 जिल्हे आधीपासूनच स्तर तीनमध्ये होते. आता या सर्व जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

स्तर 3 मध्ये असलेले जिल्हे खालीलप्रमाणेः

मुंबई शहर व उपनगर, नाशिक, उस्मानाबाद, सांगली, बीड, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, गडचिरोली, ठाणे, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या 33 जिल्ह्यांमध्ये स्तर 3 मधील निर्बंध असतील. राज्यात स्तर 2 आणि 5 मध्ये एकही जिल्हा नाही. स्तर 4 मध्ये रायगड, रत्नागिरी व कोल्हापूर हे जिल्हे आहेत.

स्तर 3 मध्ये काय सुरु अन् काय बंद, जाणून घ्या

1) तिसऱ्या स्तरात अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राहणार आहे. अत्यावश्यक नसलेली
दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दिवसांत दुपारी 4 पर्यंत खुली ठेवता येणार आहेत.

2) रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. वीकेंडला हॉटेल सुरू राहणार नाहीत.
त्या वेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल.
मॉल्स, थिएटर, मल्टिफ्लेक्स बंद राहतील.

3) आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.
जीम, सलून आणि स्पा दुकाने 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.

तिसऱ्या लाटेत 50 लाख नागरिकांना संसर्गाची भीती?
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील जवळपास 50 लाख नागरिक संक्रमित होण्याची भीती असून मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर आनुषंगिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ( Dr. Rajendra Shingane) यांनी दिली.

… म्हणून राज्याला अधिक काळजी घ्यावी लागेल- भार्गव
राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जास्त सावध राहावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव (Balram Bhargava) म्हणाले की, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा, पालघर आणि उस्मानाबादेत आजही संक्रमणाचा दर 5 ते 9 टक्के आहे. म्हणून तिथे जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  Delta Plus Variant | restrictions maharashtra due delta plus level three rules 33 districts including mumbai

हे देखील वाचा

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा डर्टी पिक्चर ! तीन महिला होमगार्डशी अश्लील चाळे

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोट छाटली होती, ते देशभक्त नव्हते’

अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स ! ED आज काय पाऊल उचलणार?, चर्चेला उधाण

भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आज वाहतुकीत बदल