delta plus variant | डेल्टा प्लसचा धोका वाढला; राज्यात पुन्हा कडक निर्बंध? आगामी 2 दिवसांमध्ये होऊ शकतो निर्णय

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले होते. ते संकट कमी होत नाही तो पर्यंत राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा (delta plus variant) धोका वाढल्याचे समोर आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राज्यात या विषाणूचे २१ रुग्ण आढळले आहेत. त्यातच काही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येतझालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते.

Ledy Police | लग्‍नाच्या आमिषाने महिला पोलिसला अनेक लॉजवर फिरवलं, बलात्कार प्रकरणी सोलापूरमध्ये तिघांवर FIR दाखल

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात यावर निर्णय जाहीर करण्यात येणार असून अत्यावशक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळा

पुन्हा कमी करण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. डेल्टा प्लस व्हेरियंटचे महाराष्ट्रात रुग्ण आढळल्याने राज्याला केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला डेल्टा प्लस व्हेरियंट आमंत्रण देऊ शकतो त्यामुळे हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजतेय. २० दिवसांपूर्वी राज्यातील निर्बंध शिथिल केले होते.


Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे रोज नवीन विक्रम, मुंबईत 103 रुपयांवर पोहचला एक लीटरचा भाव

त्यानंतर कोरोनाबाधितांच्या प्रमाणात पुन्हा वाढ होत आहे. त्यातच डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू
आढळल्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राज्यातील जिल्ह्यांची कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे पाच टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती.

Kolhapur News | जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून उघडणार

त्यानुसार आठवड्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध कमी -जास्त प्रमाणात लागू करण्याचे धोरण सुरु आहे.

McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

मात्र काही दिवसापासून वाढत्या बाधितांची संख्या आणि डेल्टा प्लस विषाणू यामुळे निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत.

फेसबुक ला लाईक करा

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ !

काही दिवसांपूर्वी १० हजारांच्या खाली गेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी काही प्रमाणात
वाढ झाली.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिवसभरात १०,०६६ कोरोनाबाधितांची
नोंद झाली. तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला.

Pimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहिम; दोन दिवसात 8 जणांना पकडले

दरम्यान, देशात डेल्टा प्लस या व्हेरिंटचे देशात ४० रुग्ण आढळले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील सात
जिल्ह्यात २१ रुग्ण आहेत.
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्याचबरोबर केरळ आणि मध्य प्रदेशमध्येही नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र आणि केरळला धोक्याचा इशारा दिला
आहे.

Web Titel : delta plus variant | The risk of Delta Plus increased; Strict restrictions again in the state? The decision can be made in the next 2 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update