Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delta Plus variant । कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेने माणसाला भयावह करून सोडलं आहे. त्यातच तज्ज्ञाकडून सांगितल्या प्रमाणे की देशाला तिसऱ्या लाटेचा देखील धोका कायम आहे. मात्र, दुसऱ्या लाटेचा प्रभाव नियंत्रणात येतोय तोवर करोना विषाणूच्या एका नव्या जातीनं उडी घेतली. आताच्या नव्या आलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus variant) असं त्या विषाणूचं नाव आहे. तर यामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. या धोकादायक विषाणूमुळे जगभरातील देशांनी धास्ती घेतली असताना देशात दहा राज्यात डेल्टा प्लसचे (Delta Plus variant) रुग्ण आढळत आहेत. यावरून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या संक्रमणाबाबत एक इशारा दिला आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (Delta Plus variant) रुग्ण महाराष्ट्रात बहुतांश आढळून आल्याने राज्यातील चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट (Delta Plus variant) जगात आजतागायत आढळलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं सांगितलं आहे. यावरून आता कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लोकांनी देखील दक्षता आणि मास्क घालून ठेवणं आवश्यक आहे. असं WHO म्हटलं आहे.

85 देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण –

पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातल्या जवळपास 85 देशात याचे रुग्ण सापडले आहे. आजतागायत आढळलेल्या करोना व्हेरिएंटमध्ये (Delta Plus variant) हा प्रकार अधिक गतीने वेगाने संक्रमण करणारा प्रकार आहे. आपण सर्वानी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. तसेच, डेल्टा व्हेरिएंट  या विषाणूला थांबवायचं असल्यास जगातल्या सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा. असं WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी सांगितलं आहे. यावेळी ते शुक्रवारी पत्रकार परिषदेमधून याबाबत माहिती दिली आहे.

डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी सांगितलं आहे की, ‘जेवढं या विषाणूचं संक्रमण आपण कमी करू, तेवढे त्याचे व्हेरिएंट  कमी असतील,
तर त्यासाठी व्यापक लसीकरणाची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हे लसीकरण जगातल्या सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, पुढे त्यांनी म्हटलं आहे की,
यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर नाराजी व्यक्त केलीय.
“तुम्ही या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला गर्दी दिसेल.
जणूकाही साथ नाहीच आहे. मग तुम्ही ज्या देशांमध्ये लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाउन दिसेल,
असं देखील त्यांनी (Dr. Tedros) म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : delta variant | who chief dr tedros warns world about corona delta plus variants appeal vaccination

हे देखील वाचा

Pune Unlock | पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर ! सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद

Natural Gas Price | 1 ऑक्टोबरला ठरणार घरगुती गॅसच्या नवीन किंमती; दर 60 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता : ONGC

Burglary in Pune | नर्‍हे परिसरातील गोडाऊन फोडून 62 लाखाचा माल लंपास, सिंहगड रोड पोलिसांकडून एकाला अटक