Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

नवी दिल्ली (New Delhi) : Delta Variant | कोरोना व्हायरसची (Coronavirus) दूसरी लाट संथ झाली आहे अणि आता तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात जास्त धोका कोरोनाच्या Delta variant बाबत निर्माण झाला आहे. याच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला एक्सपर्ट जास्त घातक मानत आहेत. कोणत्या पाच लोकांना Delta variant चा धोका जास्त आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी 8 कोणती कामे करावीत ते जाणून घेवूयात…

delta variant who is more at risk of contracting the delta variant precaution

कुणाला जास्त जोखीम?

* पब्लिक हेल्थ इंग्लंडचा दावा आहे की, कमी वयाचे लोक, लस न घेतलेले आणि आंशिक लसीकरण केलेल्या व्यक्तींना संसर्गाचा जास्त धोका आहे.

* तर एका संशोधनात 50 पेक्षा जास्त वय असलेले आणि लस न घेतलेले लोक जास्त प्रमाणात संक्रमित आढळले आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे

याच्या काही लक्षणात खोकला, अतिसार, ताप, डोकेदुखी, त्वचेवर लाल चट्टे, बोटे आणि पायाच्या बोटांचा रंग बदलणे, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास यांचा समावेश आहे. तज्ज्ञांनुसार डेल्टा प्लससाठी जबाबदार लक्षणे : पेटात वेदना, मळमळ आणि भूक कमी होणे.

डेल्टा प्लसपासून असा करा बचाव

– कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी आपले हात नियमितपणे साबणाने धुवत रहा.

– शक्य असेल तर घरातून बाहेर पडू नका आणि जात असाल तर मास्क घाला आणि सॅनिटायझर सोबत ठेवा.

– मास्क आणि कोणत्याही वस्तूला स्पर्श करणे टाळा.

– संक्रमित लोक आणि इतर लोकांपासून कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवा.

– शिंकताना किंवा खोकताना तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरने कव्हर करा आणि टिश्यू पेपर योग्य ठिकाणी टाका.

– आरोग्य अगोदरच बिघडलेले असेल तर घराच्या बाहेर पडू नका.

– स्मोकिंग टाळा. फुफ्फुसांना प्रभावित करणार्‍या वस्तूंपासून दूर रहा.

– कोरोना व्हायरसपासून वाचण्याची सर्वात सोपी पद्धत ही आहे की, विनाकारण घराच्या बाहेर पडू नका.

हे देखील वाचा

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Mumbai Crime News | बलात्कारातील आरोपी हातकडीसह पोलीस व्हॅनमधून पळाला; मुंबईतील सिग्नलवर घडला प्रकार

BJP MLA | रिसॉर्टवर जुगार खेळताना भाजप आमदारासह 13 जणांना रंगेहाथ पकडले; 7 तरुणींचा समावेश, दारूच्या बाटल्या आढळल्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : delta variant who is more at risk of contracting the delta variant precaution

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update