देलवडी खून प्रकरण : संतोष जगतापला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील देलवडी येथे ५ ऑगस्ट २०१७ रोजी वाळू व्यवसायाच्या वादातून स्वप्नील उर्फ पिंटू शेलार याचा खून करण्यात आला होता. हा खून संतोष जगताप, समीर जगताप, सोमनाथ विष्णू शेलार, विशाल उर्फ बाबू मेमाणे, रणजित उर्फ बाबू वांझरे, बबलू विश्वास डेंगळे व अनिल उर्फ सुनील शितोळे त्याचे अन्य साथीदार यांनी मिळून केला असल्याची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती तर संतोष जगतापने जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संतोष जगताप हा फरार झाला होता. दि. २० ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) टिम आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या बातमीवरून यवत पो. स्टे. गु. र. नं. ७२०/२०१८ भादंवि क. ३०२, १२०(ब), ३४ सह आर्म अ‍ॅक्ट क. ३, २५, ४, २७ या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे संतोष संपत जगताप वय ३५ रा. यशोदिप निवास, चौधरवस्ती, खराडी बायपास पुणे. मूळ रा.राहू ता.दौंड जि.पुणे यास वाघोली ता. हवेली येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यास पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर यवत पोलिसांनी त्यास अटक करून दि. २१ ऑगस्ट रोजी मे. दौंड कोर्टात पोलीस कोठडी मिळण्यासाठी हजर केले असता संतोष जगताप यास दि. २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व बारामती विभागाचे अपर पो. अधीक्षक जयंत मिणा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडणे कामी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्तात्रय तांबे यांचे पथकाने आरोपी संतोष जगताप यास वाघोली येथून जेरबंद केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –