देलवडी येथे तरुणाचा धारदार हत्यारांनी वारकरून निर्घृण खून

दौंड : अब्बास शेख : पोलीसनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील देलवडी येथे स्वप्नील ज्ञानदेव शेलार वय ३५ वर्षे याचा रविवार दिनांक ५/८/२०१८ रात्री साडेनऊ च्या दरम्यान धारदार हत्त्याराणे वारकरून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही थरारक घटना देलवडी जवळील शेलार वस्तीच्या डांबरी रस्त्यावर घडली आहे. पोलिसांना घटना स्थळी एक पिस्तुल सापडले आहे.

[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bad282b-992c-11e8-94c3-5910fbe2d202′]

हल्ल्यानंतर मारेकरी अज्ञात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. स्वप्नील शेलार हा एका खून प्रकरणातील व्यक्तीवर झालेल्या जीवघेण्याहल्ल्यातील आरोपी होता त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी काही संशयितांची नावे पोलिसांना दिली असून हा नेमका खून कोणी व का केला याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या खूनामुळे दौंड तालुक्यात गँगवार भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.