नवी मुंबई, ठाणे प्रमाणेच पुण्यातही 15 दिवस Lockdown करण्याची मागणी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून योग्यत्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पुणे शहरात देखील 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. खर्डेकर यांनी आयुक्तांना केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन हाच उपयुक्त पर्याय आहे. त्यामुळे पुणे शहरातमध्ये नवी मुंबई,ठाणे,कल्याण डोंबिवली प्रमाणे पुनश्च किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन करावा. प्रभाग 13 एरंडवणे हॅपी कॉलनीत अवघ्या 15 दिवसांत रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली आहे. तरी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुनश्च किमान 15 दिवसांसाठी लॉकडॉउनचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 मध्ये शिथिलता मिळाल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये वेगाने वाढ होत आहे. अनलॉक 1 मध्ये पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. गुरुवारी रात्री साडे दहपर्यंत शहरात नव्याने 937 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.