‘त्या’ तहसीलदाराविरुद्ध कारवाईची मागणी

नांदेड: पोलीसनामा ऑनलाईन
माधव मेकेवाड

पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्या तहसीलदारांविरुद्ध कारवाईची मागणी पत्रकारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले नरसीफाटा येथील पत्रकाराने वाळू माफियांविरुद्ध सत्य लिखाण करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध खोटी तक्रार देण्यास भाग पडून खंडणीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी करून पत्रकार व पत्रकारितेची मुस्कटदाबी करणाऱ्या नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या अनुशंघाने आज पत्रकार संघाने जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

न्यायालयातील खटल्यांच्या सुनावणीचे होणार थेट प्रक्षेपण

[amazon_link asins=’B077J5D76C,B075GDCBX6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5cd5359a-c16e-11e8-b8a9-19dc8abfc646′]

नायगाव तालुक्यातील बळेगाव रेतीचे साठे गायब झाले होते. अवैध रेती विक्रीला खतपाणी घालण्याचे काम तहसील प्रशासनाकडून होत आहेत. अनेकवेळा अवैद्ध रेती उत्खनन व रेती विक्री विरुद्ध कारवाई होत नसल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनात आणून देण्यात आले होते. बळेगाव,राहेर,हुससा , सातेगाव परिसरातून सतत होणाऱ्या अवैध रेती विक्रीविरुद्ध नरसी येथील पत्रकार लक्ष्मण बरगे यांनी आपल्या वृत्तपत्रातून सत्य लिखाण केले होते.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac01d1e0-c168-11e8-825d-2723fa9a07b4′]
तुम्ही गे आहात काय? रक्तदात्यांना होणार विचारणा

अवैध रेती विरुद्ध आवाज उठवायचा आपले बिंग फुटेल म्हणून तहसीलदार सुरेखा नांदे यांनी पत्रकार बरगे हे रेती घाट बंद पडतो अन्यथा मला पैसे द्या अशी मागणी केल्याची खोटी तक्रार देण्यास काही लोकांना भाग पडले . तहसीलदार नांदे यांच्या गैरव्यवहारास पाठिंबा देणाऱ्या, अवैध रेती विक्रीचे काम करणाऱ्या कांही जणांनी तहसीलदार नांदे यांच्याकडे खोटी तक्रार दिली. वास्तविक पत्रकार खंडणी मागत असेल तर संबंधित लोकांनी पोलिसात तक्रार देणे आवश्यक होतो. केवळ तहसीलदार सांगतात म्हणून कांही लोकांनी पोलिसात जाण्याऐवजी तहसीलदार नांदे यांच्याकडे खोटी तक्रार दिली होती. या खोट्या तक्रारीच्या आधारे तहसीलदार नांदे यांनी संबंधित पत्रकारास कोणत्याही प्रकारची विचारणा न करताच कुंटूर पोलिसनकडे बरगे विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन आपल्या सहीनिशी सादर केले. कुंटूर पोलिसांनी घटनेची व आलेल्या अर्जाची शहानिशा केल्यानंतर सादर तक्रार खोटी असल्याचे समोर आल्याने बरगे विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5518a1e1-c167-11e8-825d-2723fa9a07b4′]

नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांची प्रशासकीय सेवेतील कारकीर्द वादग्रस्त, भ्रष्टाचारी राहिलेली आहे. हिंगोली जिल्ह्यात नांदे यांच्या विरुद्ध न्यायालयात एक खटलाही सुरु आहे. तहसीलदार नांदे ह्या अवैध धंद्याला स्वतः खतपाणी घालतात . हे जगजाहीर असताना त्यांनी पत्रकार बरगे विरुद्ध दाखल केलेली खोटी तक्रारही उघड झाली आहे. केवळ आपल्या पदाचा गैर वापर करत अवैध धंद्यांना खतपाणी घालणे,त्यांची पाठराखण करणे सत्य लिखाण करणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करणे, पत्रकारांविरुद्ध खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करणे आदी प्रकार तहसीलदार नांदे यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे पत्रकार व पत्रकारितेची मुस्कटदाबी करणाऱ्या तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या विरुद्ध कारवाई करावी.अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज पत्रकारांनी जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन तक्रार दिली. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागपूरकर,जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी, माजी जिल्हा अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे , ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त चौधरी,महानगर उपाध्यक्ष किरण कुलकर्णी,रवींद्र संघेवार,आजम बेग, राम तरटे, जिल्हा सरचिटणीस अनिल धमणे,लक्ष्मण भवरे,सुभाष लोणे, माजी जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, पत्रकार मनोहर तेलंग,गंगाधर भिलवंडे, मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सय्यद जाफर, सुभाष पेरकेवार, दिलीप वाघमारे, अशोक सूर्यवंशी, प्रकाश महीफळे , लक्ष्मण बरगे, शेषेराव कंधारे , बालाजी हणमंते, पवनकुमार पुठेवाड,सचिन डोंगळीकर यादींची उपस्थिती होती.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f907770-c167-11e8-b498-63a8849985c5′]