पुण्यातील मोदींच्या सभेसाठी वृक्षतोड, संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी मैदानातील 16 झाडे कापण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापकीय प्रशासनाच्या वतीने जरी परवानगी घेतली आहे, असे सांगितले जात असेले तर मग रात्रीच्या अंधारात झाडे का कापली असा प्रश्न उपस्थित करून झाडे कापणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे केली आहे.

एस.पी. कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या मोदी यांच्या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठासाठी अडथळा निर्माण होत असल्याने ही झाडे तोडण्यात आल्याचे समोर आले. वास्तविक 16 झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी परवानगी मागितली असताना प्रत्यक्षात अनेक जुनी व मोठ-मोठी झाडे बुंध्यापासून कापण्यात आली असल्याचे वंदना चव्हाण यांनी केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुणे शहरात येणार होती. त्यावेळी देखील सिंहगड रस्त्यावरील मोठ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या. नेत्यांच्या दौऱ्यासाठी गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा झाडे तोडण्यात आलेली आहेत. सरकार एककीकडे 33 कोटी वृक्ष लागवड करण्याची जाहीरात करत असतानाच भाजप पक्षाची जाहीरात करण्यासाठी वृक्षतोड करत आसल्याचे वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून झाडे कापल्याचे संस्थेचे म्हणणे होते. तर झाडे नाही तर फांद्या तोडल्याचे पुण्याचे महापौर मुक्ता टीळक यांनी म्हटले. झाडे तोडल्यावर टीका होत असताना आता मैदानामध्ये येणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी