Coronavirus Lockdown : राज्यात विजेची मागणी साडेपाच हजार मेगावॅटने घटली !

पोलीसनामा ऑनलाइन –  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व औद्योगिक वसाहती बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विजेच्या मागणीत पाच ते सहा हजाराची घट झाली आहे. परिणामी राज्यातील काही वीज निर्मिती केंद्रातून वीज घेणे महावितरणकडून बंद करण्यात आले आहे. राज्यातील रविवारी दुपारी 14 हजार 300 मेगावॅट विजेची मागणी होती. रात्री ही मागणी 11 हजार 600 मेगावॅटपर्यंत खाली आली होती. त्यामुळे परळी, खापरखेडा, नाशिक आणि अमरावती जिल्ह्यतील वीज निर्मिती केंद्रातून वीज घेणे थांबविण्यात आले आहे.

औद्योगिक वसाहतीत कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी औद्योगिक कामे थांबविण्यात आली आहेत. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होऊ लागला आहे. मराठवाडयात परळी औष्णिक वीज केंद्रामध्ये 750 मेगावॅटच्या केंद्रातून वीज निर्मिती सुरू होती. ती आता पूर्णत: थांबविण्यात आली आहे. ज्या क्षणी पुन्हा वीज सुरू करा, असे सांगितले जाईल तेव्हा पुन्हा वीज निर्मिती सुरू करता येईल. असे महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार कांबळे यांनी सांगितले.

दुष्काळामुळे पाणी नसल्याने दोन वर्षे वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते. मध्यंतरी कोळसा नसल्यानेही परळी वीज केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नव्हते. आता कोरोना विषाणूमुळे औद्योगिक वसाहती बंद असल्याने वीज मागणी घटली. परिणामी भुसावळ, अमरावती येथून वीज घेणेही थांबविण्यात आले आहे. दरम्यान जेथील वीजनिर्मिती तुलनेने महाग आहे, तेथून ती घेणे आधी थांबवले जाते. विजेची मागणी घटल्याने भुसावळ येथील जुने 420 तसेच खापरखेडा येथील चार संचातून होणारी 840 मेगावॅट वीज वापर राहिलेला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like