डिएसके प्रकरण : मालमत्तेच्या लिलावानंतर वाटप करताना ठेवीदारांना प्राधान्य देण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी यांच्या संपत्तीचा लिलाव केल्यानंतर पैसे वाटप करताना ठेवीदारांना प्राधान्या देण्याची मागणी करणारा अर्ज गुंतवणूकदारांनी न्यायालयात केला आहे.

ठेवीदारांच्या ठेवी परत न करता फसणूक केल्याप्रकऱणी दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हे सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांचा लिलाव करून पैसे ठेवीदार व इतरांना परत करण्यात येणार आहेत.

आम्हाला गुंतवणूक केलेल्या पैशांची आजारपण आणि कौटुंबिक कारणांसाठी गरज आहे. बँका आणि सरकारकडे देय असलेल्या रक्कम वसूल करण्यासाठी इतर पर्यायही आहेत. लिलावातून आलेले पैसे सरकार आणि बँका यांना दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाटप करताना ठेवीदारांना प्राधान्य देण्यात यावा असा अर्ज करण्यात आल्याचे ठेवीदारांचे वकील अड सुदीप केंजळकर यांनी सांगितलेत.

डिएसके यांनी न्यायालयात ६ कोटी ६५ लाख रुपये जमा केले आहेत. त्यांची महागडी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांची विक्री केल्यानंतर जमा होणारी रक्कम ठेवीदारांना देण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा असा आदेश न्ययालयाने यापुर्वी पोलिसांना दिला आहे.