पुजा चव्हाण हिच्या मृत्युच्या चौकशी बाबत भाजपा महिला आक्रमक, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  पुजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची चौकशी व वनमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणीबाबत आज लासलगाव पोलीस ठाण्यात खा. भारती पवार, सुवर्णा जगताप अध्यक्ष भारतीय जनता महिला मोर्चा च्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अजीनाथ कोठाळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भारतीय जनता महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामिणच्या वतीने पुजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युच्या चौकशीची तसेच ज्यांच्यावर आरोप होत आहेत असे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने निवेदन दिले

पुजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युबाबत सरकार बघ्याची भुमिका घेत असुन , महाराष्ट्रात स्त्रियांच्या संरक्षणासाठी तयार केलेला महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ अ‍ॅक्ट , २०२० आणि स्पेशल कोर्ट अ‍ॅन्ड मशिनरी फॉर इंम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ , २०२० अशा दोन्ही कायद्यान्वये वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी व्हावी ही मागणी आम्ही करत आहोत .पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीने आत्महत्या करुन आज वीस दिवस झाले तरीही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे या तपासात अडचणी येत आहेत असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

यावेळी सुवर्णा जगताप, स्मिता कुलकर्णी ,ज्योती शिंदे, सारिका डर्ले , विजयश्री भावसार रंजना शिंदे, शैलजा भावसार, मनीषा हारळे,ऐश्वर्या जगताप, कल्याणी निकम,रुपा केदारे, भरती महाले,सिंधुताई पल्हाळ, नेहा पुंड,योगेश पाटील,रवींद्र होळकर,राजेंद्र चाफेकर,संजय वाबळे, महेश गिरी,नितीन शर्मा, ज्ञानेश्वर शिंदे,
बापू लचके,राजू राणा ,गोटूशेठ बकरे,किरण निकम,जालिंदर पवार,आदी उपस्थित होते.