अतिरिक्त आयुक्तांचा पदभार काढुन घेण्याची मागणी

पुणे: पाेलीसनामा ऑनलाईन

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले -तेली यांच्याकडील काही विभागांचा पदभार काढून घ्या अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी मागणी आज भाजपच्या नगरसेवकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे केली. गेली काही दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त उगले आणि भाजप नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगला असून सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी उगले यांच्यावर आरोपांच्या फेरी झाडून निषेध केला होता. परंतू आज प्रथमच आयुक्तांपुढे गार्‍हाणे मांडल्याने ते काय निर्णय घेतात याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.
[amazon_link asins=’B01GZPDV2W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’493e33cc-901b-11e8-bb41-f5f5f483bd68′]

पुणे महापालिकेमध्ये भाजपची बहुमताची सत्ता आहे. परंतू अधिकार्‍यांच्या विशेषत: अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांच्या कामाच्या पद्धतीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये तक्रारीचा सूर आहे. कर्मचार्‍यांच्या बदल्या, पदोन्नती, ग्रेड पे तसेच भाजप नगरसेवकांच्या काही प्रकरणांमध्ये उगले यांनी थेट राज्य शासनाकडून अभिप्राय मागविल्याने नाराजीत भर पडली आहे. एकीकडे कार्यकर्ते आणि नागरिकांना दिलेली आश्‍वासने आणि ती सोडविण्यासाठी लालफितीची आडकाठी यामुळे या नगरसेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नुकतेच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी थेटच आरोप करत, उगले यांचा निषेधही केला होता. परंतू विरोधीपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस अणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी महिला आणि पारदर्शक काम करणार्‍या अधिकारी म्हणून उगले यांची पाठराखण केल्याने भाजपला काहीसे सबुरीने घ्यावे लागले होते.
[amazon_link asins=’B01LYX1JJL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53d08027-901b-11e8-8f94-c309ff594858′]

परंतू आज झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर भाजपच्या नगरसेवकांनी थेट महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेउन अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांच्याकडील काही खात्यांचा पदभार काढून घ्यावा, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर या माननीयांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सौरव राव हे गेली काही दिवस सुट्टीवर होते. ते हजर होताच भाजपच्या नगरसेवकांच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे. याला कारणही घडले ते दोनच दिवसांपुर्वी उगले यांनी तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणार्‍या अधिकार्‍यांची पदोन्नती आणि बदलीचे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त सौरव राव काय भुमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.