मजा करुन झाल्यावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १ लाखाची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – महिलेसोबत शारीरिक संबध ठेवून, एक लाखाची मागणी करुन, न दिल्यास अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पीडित ३८ वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा रविवारी (ता. १३) चिंचवड पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.

विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना उल्हासनगर-ठाणे आणि चिंचवड येथे २१ नोव्हेंबर ते ९ जानेवारी २०१९ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विश्वनाथ याने फिर्यादी महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंधांची तिच्या नकळत व्हिडिओ क्लीप काढली. आरोपी आणि पीडित महिला यांच्यात झालेला संवाद पतीला दाखविण्याची धमकी दिली. तसेच एक लाख रूपये न दिल्यास शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.