पंतप्रधान मोदीच्या फोटोला काळ फासणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन 

बॅनरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर काळी शाई टाकून देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला म्हणून युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. अर्धापूर तालुक्यातील बाबा पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या बॅनरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर काळी शाई टाकल्याची माहिती समोर येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7aec14d5-ceb3-11e8-8ebb-f1651a22ff72′]

पंतप्रधान पद हे देशाचे घटनात्मक पद आहे. नरेंद्र मोदी हे भाजपचे असले, तरी पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च पदावर असल्यामुळे त्यांचा उचित सन्मान सर्वांनीच केला पाहिजे. परंतु, युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात तसेच दाभड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोलियम खात्याकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर पंतप्रधानांच्या प्रतिमेला शाई लावून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष पप्पु कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे तसेच नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष सत्यजीत भोसले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी या वेळी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

नांदेड महानगर भाजपचे अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. चैतन्यबापू देशमुख, प्रदेश प्रभारी संजय कोडगे, व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, सरचिटणीस विजय गंभीरे, रामराव केंद्रे, दिलीपसिंह ठाकूर, प्रविण साले, मनपा विरोधी पक्षनेत्या गुरूप्रितकौर सोडी, यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेतली.

दमानिया यांना न्यायालयाचा झटका; खडसे यांची बदनामी केल्याचा खटला रद्द करण्यास नकार

या शिष्टमंडळात स.दिलीपसिंघ सोडी, सरपंच बंडू पावडे, रवी पाटील खतगावकर, शितल खांडिल, स.राजेंद्रसिंघ पुजारी, हरभजनसिंघ पुजारी, दिपकसिंह ठाकूर, आशिष नेरलकर, प्रतापराव पावडे, बालाजी शिंदे कासारखेडकर, उभनलाल यादव, वैजनाथ जाधव, अरुण सुकळकर, आनंद पावडे, श्रीराज चक्रवार, मनोज यादव, बागड्या यादव, शंकर वानेगावकर, सतिश वेरुळकर, सुनील पाटील, गौरव कुंटूरकर, महादेवी मठपती, अभिलाष नाईक, संभाजी देशमुख, राजु केंद्रे, धरमसिंघ संधू, रवी पुजारी, संदीप कर्हाळे, संतोष कदम, मोहन जोगदंड, बाबाजी कोल्हे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

[amazon_link asins=’1542040469,817992162X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’119459c0-ceb4-11e8-ac6f-65bb7587d0fe’]