देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ करण्याची मागणी,  सुप्रीम कोर्ट 2 जूनला करणार सुनावणी 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुघलांच्या राजवटीत आपल्या देशाला हिंदुस्थान म्हटले जात असे. त्यांनतर ब्रिटीशांचे राज्य आले, ज्यांनी इंडिया म्हणण्यास सुरुवात केली. दरम्यान, बहुतेक देशवासीयांनी भारत नावाला प्राधान्य दिले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर यावर बरीच चर्चा सुरू होती. त्यानंतर घटनेत भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे लिहिली गेली. आता देशाचे नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी सर न्यायाधीश एस.ए. बोबडे यांचे खंडपीठ सुनावणी घेणार आहे.

याचिका कर्त्याच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ गुलामीचे प्रतीक असलेले ‘इंडिया’ हे नाव हटविण्यात अपयशी ठरले आहे. हे नाव न हटवल्याने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. इंडियाऐवजी भारत नाव केेल्यानं भावना निर्माण होईल, असे याचिकेत म्हटले आहे.  29 मे रोजी या खटल्याची सुनावणी होणार होती, पण सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायमूर्ती बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सुनावणी पुढे ढकलली. सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी घेईल.

याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत 15 नोव्हेंबर 1948 च्या घटनेच्या मसुद्याचा संदर्भही दिला. संविधान 1 च्या अनुच्छेद 1 वर युक्तिवाद करताना एम. अनंथासनम अय्यंगर आणि सेठ गोविंद दास यांनी ‘इंडिया’ च्या ऐवजी भारत, भारतवर्ष आणि हिंदुस्थान हे नाव अवलंबण्यास सांगितले होते. मंगळवारी अधिवक्ता राज किशोर चौधरी याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like