रमजानच्या निमित्ताने लोडशेडिंग थांबविण्याची मागणी; ‘महावितरण’च्या अभियंत्यांना निवेदन

परभणी: पोलीसनामा ऑनलाईन – रमजानचा पवित्र महिना ( चौदा ) एप्रिलपासून सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लिम समाज बांधव संपूर्ण दिवस उपवास करतात. उन्हाळ्याचे दिवस आहेत. रमजानचा पवित्र महिना यावर्षी एप्रिल आणि मेमध्ये आला आहे . रोजा (दिवसभर उपवास) सकाळी उठून केले जाते. त्यासाठी स्वयंपाक इ. केले जाते. यामुळे व इतर कामांमध्ये कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी लोडशेडिंग थांबवावी अशी मागणी केली जात आहे.

पाथरी तालुक्यातील बाभळगांव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख जुलेखा यांनी उप-कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोडशेडिंगमुळे होणारी गैरसोय टाळून (भाविकांच्या सोयीसाठी) महावितरण अभियंता यांनी बाभळगांव येथील (k 33 केव्ही) येथून बाभळगांव फीडरवरील लोडशेडिंग थांबवत अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यात यावा यासाठी पाथरी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाकडे 24 तास वीजपुरवठा करण्याची मागणी निवेदनातून सादर केली आहे.