Pune News : 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कर्ज फेडण्यासाठी मित्राला कुत्रा विकत घेण्याचा बहाणा करुन तिघांनी तळजाई टेकडीवर नेले. त्याठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून 50 हजारांची मागणी केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

गौरव काळे (रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड), सागर गवळी (रा.बिबेवाडी ओटा स्कीम), रोहन कांबळे (रा.ओटा स्कीम बिबेवाडी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी केंजळेनगर येथील 21 वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिन्ही आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. यातील सागर गवळी याच्यावर दीड लाखांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याला 50 हजाराची गरज होती. त्यातूनच त्यांनी फिर्यादी तरुणाला कुत्र्याचे पिल्लू खरेदी करण्याच्या बहाणा करून तळजाई टेकडी येथे घेऊन गेले. त्यानंतर गवळी याने कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडे 50 हजाराची मागणी केली. मात्र तरुणाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणाला तेथून सोडून दिले. त्याने घरी आल्यानंतर त्याच्या सोबत झालेल्या प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर बिबेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.