५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप आमदार योगेश टिळेकरांसह तिघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनव्दारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे (सर्व रा. कोंढवा बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’170f2ccf-ce0c-11e8-911c-75007ed73d97′]

याप्रकरणी रविंद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली असुन पोलिसांनी भादंवि कलम 385,379,427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही गुन्हा दि. 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज-कोंढवा रोड परिसरात घडला आहे. फिर्यादी हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्‍ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c5f3195-ce0c-11e8-8beb-0db2eed4aff1′]

दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालु असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिली. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली आहे. फिर्यादीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी सारखा गंभीर गुन्हा भाजपच्या आमदारावर दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.