‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुलेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने ‘पिंपरी चिंचवड’च्या महापौरांच्या राजीनाम्याची मागणी !

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या कक्षाबाहेर राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माईंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. त्याचेच पडसाद आता उमटू लागले आहेत.

3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती होती. यानिमित्त सांगवीला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्याकडून एक वादग्रस्त विधान झालं. याचेच पडसाद कालपासून उमटताना दिसत आहे. काल भारिपने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे महापौरांचं पद काढून घेण्याची मागणी केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीसांकडेही महापौरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

आज सर्व खुल्या समर्थकांनी महापौरांच्या कक्षेबाहेर आंदोलन केलं आहे. महापौरांचा निषेध केला जात आहे. राष्ट्रीय पक्षांनीही यात उडी घेतली असून महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली गेली. तशा घोषणाही होताना कक्षाबाहेर दिल्या गेल्या. महापौरांनीही यानंतर तातडीने बाहेर येऊन सर्वांशी संवाद साधला. माझ्या तोंडून जे काही शब्द बाहेर पडले त्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. त्याबद्दल आता मी दिलगीरी व्यक्त करते असेही त्या म्हणाल्या. यानंतर उपस्थितांनी मात्र दिलगिरी व्यक्त न करता माफीनामा द्यावा, माफीच मागावी असा आग्रह धरला. त्यांनी बिनशर्थ माफी मागितली आहे. शहरात जरी हा प्रश्न संपला असला तरी राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे इथली परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न आता महापौरांकडून केला जात आहे. प्रकरण मिटवण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/