Demarcation Of Parliament House | लोकसभेच्या जागा वाढवण्याचा होतोय विचार; मात्र नवीन संसदेची आसनक्षमता पडतीये कमी

दिल्ली : वृत्तसंस्था – Demarcation Of Parliament House | अनेक वादाच्या फेऱ्यानंतर अखेर नवीन संसद भवनाचे (New Parliament House) उद्घाटन पार पडले असले तरी, संसद भवनातील आसनक्षमता कमी पडण्याची शक्यता आहे. कारण आता देशात लोकसभेच्या जागा (Lok Sabha Seats) वाढवण्याची चर्चा सुरु आहे. सध्या लोकसभा खासदारांच्या (MP) 543 जागा असून त्या 1 हजार 210 पर्यंत वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

देशाची लोकसंख्या (Indian Population) दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश (Most Populous Country) म्हणून भारत (India) ओळखला जातो आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी वाढवणे हे क्रमप्राप्त आहे. सध्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर नव्या सीमांकनानंतर लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढेल. त्यामुळे आपल्या राज्याच्या लोकसभेत आता एकूण 48 जागा प्रतिनिधित्व करतात, मात्र त्यांची संख्या 82 वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या भारताची लोकसंख्या ही 142 कोटींच्या वर पोहोचली आहे. देशाचे संसद भवन हे प्रत्येक राज्याचे व राज्यातील प्रत्येक नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असते.
लोकशाहीसाठी (Democracy) संसद भवन ही महत्त्वाची वास्तू असून लोकप्रतिनिधींनी नागरिकांचा आवाज तिथपर्यंत पोहचवणे अपेक्षित असते.
नागरिकांच्या मागण्या, गरजा आणि अपेक्षा मांडण्याचा तो महत्त्वपूर्ण मंच आहे.
मात्र सध्या एका खासदारावर अतिरिक्त लोकांचा भार येऊ लागला आहे.
जर 10 लाख लोकसंख्येमागे एक लोकसभेची जागा असे ठरले तर सध्याच्या लोकसंख्येप्रमाणे देशात 1 हजार 210
मतदारसंघ (Constituency) होतील, पण नव्या संसद भवनामध्ये फक्त 888 खासदार बसू शकतील एवढीच
व्यवस्था आहे, त्यामुळे 888 मतदारसंघ तयार करायचे झाल्यास, 16 लाख लोकसंख्येमाग एक मतदारसंघ असे
गणित बसवावे लागेल.

याआधीच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह (Harivansh Singh) आणि भाजपचे राज्यसभा
खासदार सुशील मोदी (MP Sushil Modi) यांनीही नवीन सीमांकनाबाबत (Demarcation Of Parliament House)
उल्लेख केला आहे. 1952 साली देशात पहिलं सीमांकन झालं तेव्हा 494 लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आले,
त्यानंतर 1963 साली दुसरं सीमांकन करण्यात आलं आणि 522 मतदारसंघ केले गेले.
1971 ला तिसरं सीमांकन झालं त्यात 543 लोकसभा मतदारसंघ झाले.
2022 मध्ये सीमंकनानंतरही जागा वाढल्या नाहीत, त्यामुळे आता 2026 मध्ये सीमांकन होणार आहे.

Web Title :  Demarcation Of Parliament House | There are plans to increase Lok Sabha seats; But the seating capacity of the new parliament is getting less

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)