Demat Account Increased in India | लॉकडाऊन आणि WFH ने शेअर मार्केटला नवीन गुंतवणूकदार दिले, दोन वर्षांत दुप्पट झाली डिमॅट अकाऊंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Demat Account Increased in India | गेल्या दोन वर्षात मार्केट आणि मार्केट मेकर्सनी जे साध्य केले ते गेल्या दोन दशकात सध्या झाले नाही. नोव्हेंबर 2021 पर्यंत डिमॅट खात्यांची संख्या दुप्पट होऊन 7.7 करोड झाली आहे जी मार्च 2019 मध्ये 3.6 करोड होती . सेबीचे अध्यक्ष (SEBI Chairman) अजय त्यागी (ajay tyagi) यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे (covid 19) लॉकडाऊन लागू झाल्यापासून आणि कामाची घरगुती संस्कृती सुरू झाल्यापासून लाखो तरुणांनी प्रथमच गुंतवणूकदार म्हणून बाजारात प्रवेश केला आहे. यापैकी 75 टक्के गुंतवणूकदार हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. (Demat Account Increased in India)
सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले कि, ” ग्रोबल ट्रेंड ” अनुषंगाने, आम्ही भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ पाहिली आहे.
2020 मध्ये दर महिन्याला सरासरी 4 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली.
2021 ही संख्या तीनपट वाढून दर महिन्याला 20 लाख तर नोव्हेंबर 2021 मध्ये सुमारे 29 लाख प्रति महिना झाली,
जी कोरोनापूर्वीच्या आर्थिक वर्ष 2020 च्या मासिक सरासरीच्या 7 पट जास्त आहे.
–
अजय त्यागी म्हणाले, “मार्च 2019 पर्यंत 3.6 कोटी असलेली संचयी डिमॅट खाती नोव्हेंबर 2021 अखेर 7.7 कोटींवर गेली आहेत.
त्यामुळे खरेतर, गेल्या दोन दशकांत मार्केटने जे काही साध्य केले आहे त्याहून जास्त गेल्या अडीच वर्षात साध्य झाले आहे.
” देशातील निफ्टी इंडेक्सची (nifty index) २५ वर्षे आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगला (derivative trading) २० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात त्यागी बोलत होते.
निफ्टी 50 इंडेक्स 22 एप्रिल 1996 रोजी लाँच करण्यात आला होता. (Demat Account Increased in India)
एनएसईचे मुख्य कार्यकारी विक्रम लिमये (vikram limaye) म्हणाले की, निर्देशांक (index) 13 क्षेत्रांमधील 50 मोठ्या आणि तरल स्टॉकचे प्रतिनिधित्व करतो,जो गेल्या 25 वर्षांत 15 वेळा वाढला आहे आणि 11.2 टक्के वार्षिक रिटर्न देतो.
Web Title :- Demat Account Increased in India | number of demat accounts have more than doubled since march2019
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update