30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Demat Account | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरं तर, डिमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल अन्यथा तुम्ही डिमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाही. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जूनमध्ये यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. यानुसार, सदस्यांना त्यांच्या डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी ऑथेंटिकेशन फॅक्टर म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. तर दुसरे ऑथेंटिकेशन नॉलेज फॅक्टर असू शकते. (Demat Account)
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फिंगरप्रिंट स्कॅनिंग, फेस रेकग्निशन किंवा व्हॉइस रेकग्निशनचा वापर केला जातो. तर नॉलेज फॅक्टरमध्ये पासवर्ड, पिन किंवा कोणताही पझेशन फॅक्टर असू शकतो, जो फक्त यूजरला माहीत असतो. ग्राहकांना SMS आणि ई-मेल या दोन्हींद्वारे ओटीपी प्राप्त करावा लागेल. (Demat Account)
NSE ने जूनमध्ये जारी केले सर्क्युलर
एनएसईने सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की जर कोणत्याही कारणास्तव बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन शक्य नसेल तर यूजरना नॉलेज फॅक्टर वापरावा लागेल. ज्यामध्ये पासवर्ड/पिन, पझेशन फॅक्टर आणि यूजर आयडी असू शकतो. याचा वापर टू-फेस ऑथेंटिकेशन म्हणून केला पाहिजे. तज्ञ सांगतात की बहुतेक स्टॉक ब्रोकर्स सेकंड ऑथेंटिकेशन फॅक्टर वापरत आहेत. यामध्ये पासवर्डचा समावेश नाही. (Demat Account)
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने या संदर्भात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या 2018 च्या सर्क्युलरचा हवाला दिला आहे. खरं तर, सायबर सुरक्षेशी संबंधित या सर्क्युलरमध्ये, ऑथेंटिकेशन फॅक्टरबाबत असा फरक सांगण्यात आला आहे. म्हणून, एनएसईने 30 सप्टेंबरपासून लॉग इन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे.
सर्व स्टॉक ब्रोकर्सनी त्यांच्या क्लायंटला याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
नशीेवहर झेरोदाने वेबसाइटवर सांगितले आहे की एक्सचेंजच्या नवीन नियमांनुसार,
30 सप्टेंबरपूर्वी डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी ओटीपी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक आहे.
अन्यथा, ग्राहक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरू शकणार नाहीत.
Web Title :- Demat Account | you need to enable two factor aunthetecation in demat account til 30 september
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | अश्लिल धंदे करता असे म्हणून तरुणीचा विनयभंग करणार्या चेअरमनसह तिघांना अटक
PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?
Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph