Dementia Early Signs | काय आहे डिमेंशिया, जाणून घ्या ‘या’ आजाराच्या 6 सुरुवातीची लक्षणांबाबत

पोलीसनामा ऑनलाइन – Dementia Early Signs | काहीवेळा गोष्टी विसरण्याचा प्रकार प्रत्येकाच्या बाबतीत घडतो आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे प्रसंग कधीतरी येतात. आपण आपले पाकीट, गाडीची चावी कुठे ठेवतो हे विसरतो किंवा कधी कधी खुप वर्षांनी एखाद्याला भेटतो, आणि त्याचे नाव आठवत नाही (Dementia Early Signs). आपले मन अनेक गोष्टींनी वेढलेले असते (Dementia).

 

कधीकधी आपण महत्त्वाच्या नसलेल्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि विसरतो. मात्र, जेव्हा असे वारंवार होऊ लागते तेव्हा विसरणे ही समस्या बनते. रोज काहीतरी विसरल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो (Dementia Early Signs).

 

बहुतेक लोकांमध्ये मानसिक आरोग्य (Mental Health) स्थिती विकसित होण्याचा धोका वयानुसार वाढतो. ज्याला वैद्यकीय भाषेत स्मृतिभ्रंश (Amnesia) म्हणतात. कारण स्मृतिभ्रंश प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो, त्याची लक्षणे देखील भिन्न दिसतात.

पण ती वेळीच ओळखली गेली नाही, तर नकळत अनेक वर्षे लोक त्याच्यासोबत राहतात. या आजारावर कोणताही इलाज नाही, पण वेळेवर निदान झाल्यामुळे तुम्ही तुमच्या भावी आयुष्याबाबत निर्णय घेऊ शकता किंवा जोपर्यंत तुम्ही स्थिर आहात तोपर्यंत त्यानुसार योजना आखूशकता.

 

डिमेंशियाची सुरुवातीची लक्षणे (Early Symptoms Of Dementia)

1. पैशांचा मागोवा गमावणे (Lose Track Of Money)

संशोधनात अगोदरही आढळून आले आहे की, पैशाच्या व्यवस्थापनाचे मुद्दे डिमेंशियाचे निदान होण्यापूर्वी अनेक वर्षे अगोदर दिसून येऊ शकतात. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या (Johns Hopkins Bloomberg School of Public Health) नेतृत्वाखालील अभ्यासात असे आढळून आले की डिमेंशियाचे निदान झालेल्या लोकांना निदान होण्यापूर्वी सहा वर्षापर्यंत बिल पेमेंट चुकण्याची शक्यता असते.

 

असाही एक गैरसमज आहे की, आर्थिक त्रास हा स्मृतिभ्रंशाच्या शेवटच्या टप्प्यातच होतो, परंतु सत्य हे आहे की ते सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते.

 

2. स्मरणशक्ती अत्यंत कमी होणे (Extreme Memory Loss)

वयानुसार आपली स्मरणशक्ती कमी होत जाते. म्हणूनच हे जाणून घेणे कठीण आहे की, तुम्ही वयामुळे काही गोष्टी विसरत आहात की डिमेंशिया विकसित होत आहे म्हणून विसरत आहात. मुख्य फरक म्हणजे स्मृती कमी होणे आणि इतर लक्षणे जी दैनंदिन कामकाजावर परिणाम करतात.

 

जसे की तुम्ही किल्ली कुठे ठेवली हे तुम्ही विसरल्यास, तुम्ही ती लक्षात ठेवू शकता किंवा शोधल्यानंतर सापडते. पण जर एखाद्याला स्मृतिभ्रंश असेल, तर घरी आल्यावर त्यांनी पहिली गोष्ट काय केली हे लक्षात ठेवण्यातही त्यांना त्रास होईल.

 

3. गोंधळ (Confusion)

सुरुवातीच्या दिवसांपासून गोंधळ हे डिमेंशियाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, कारण रोजची कामे समजून घेणे कठिण होते, जसे खरेदी करताना पैसे मोजणे.

 

स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमरसोबत जगणारे लोक तारखा, ऋतू आणि काळाचा मागोवा गमावू शकतात.
जसे की दिवसा झोपणे आणि नंतर रात्रभर जागे राहणे, चुकीच्या दिवशी एखाद्या कार्यक्रमासाठी तयार होणे,
अनेकदा भेट दिलेल्या ठिकाणी जाण्याचा मार्ग विसरणे.

 

4. विनोदबुद्धीची भावना गमावणे (Loss Of Sense Of Humor)

वयानुसार आपण सर्वच चिडचिडे होतो. विशेषतः जेव्हा आपल्या दैनंदिन दिनचर्येत गडबड असते.
परंतु स्मृतिभ्रंश असलेले लोक अधिक भयभीत किंवा चिंताग्रस्त वाटू शकतात,
जसे की ते कुठे आहेत हे विसरणे. ज्या गोष्टी त्यांना एकेकाळी आवडल्या होत्या, त्यांच्यापासून ते मागे हटतात.

 

5. शब्द लक्षात ठेवण्यात अडचण (Difficulty Remembering Words)

अनेकवेळा असे घडते की एखादा शब्द आपल्या जिभेवर असतो पण तो बाहेर पडत नाही.
परंतु तज्ञ म्हणतात की एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना त्याला समजून घेण्यासाठी धडपडणे किंवा
योग्य शब्द न आठवणे हे डिमेंशियाचे प्रारंभिक लक्षण असू शकते.

 

स्मृतीभ्रंश असलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर बोलताना हैराण करणारे भाव असू शकतात.
किंवा ते फक्त मान हलवतात किंवा बोलण्याला प्रतिसाद म्हणून हसतात.
तसेच ते बोलणे बंद करतात आणि पुढे काय बोलावे हे त्यांना कळत नाही.

 

6. गोष्टी कशा वापराव्या हे विसरणे (Forgetting How To Use Things)

स्मृतीभ्रंश असलेले लोक ते आयुष्यभर दररोज जे करत होते त्या गोष्टी करू शकत नाहीत,
जसे की शर्टचे बटण लावणे, बुटाची लेस बांधणे, चमचा वापरणे किंवा भांड्याचे झाकण उघडणे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Dementia Early Signs | watch out for these early 6 signs of dementia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा