डेमू लोकलच्या पहिल्याच फेरीत चोरट्यांचा धुमाकूळ

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

एकच दिवस धावलेल्या डेमू लोकलमध्ये शुक्रवारी तांत्रिक अडचणींमुळे डब्यातील विद्युत पुरवठा बंद असल्याने जयसिंगपूर-मिरज दरम्यान चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून ६ प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम, महिलांचे पर्स लंपास केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a76bae1-cefa-11e8-8d03-9f6ad05fa407′]

पुणे-कोल्हापूर दरम्यान पॅसेंजर गाडी ऐवजी नियमीत इंजिनद्वारे डेमू लोकल सोडण्यात आली होती. ही गाडी शुक्रवारी मिरजेत येऊन मिरज-कुर्डुवाडी, कुर्डुवाडी-मिरज, मिरज-कोल्हापूर व परत कोल्हापूर-सांगली अशा पॅसेंजर गाडीच्या लिंकमध्ये धावली. कोल्हापूर-सांगली दरम्यान रात्री या गाडीत तांत्रिक अडचणींमुळे 10 पैकी 8 डब्यांमध्ये विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत जयसिंगपूर-मिरज दरम्यान 6 प्रवाशांना लुटले. यामुळे प्रवासी संतप्त बनले होते.

[amazon_link asins=’B010V1GALA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65a320e4-cefc-11e8-8355-3da45519289a’]

गाडी  मिरज स्थानकात आल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील तांत्रिक कर्मचार्‍यांशी संपर्क साधून ८ डब्यांतील बंद असलेला विद्युत पुरवठा पुन्हा सुरू केला. त्यानंतर ही गाडी सांगलीस रवाना झाली. आणि सांगली येथून ही गाडी कोल्हापूरला रात्री परत रवाना झाली. रेल्वे गाड्यांतील चोर्‍या संदर्भात व दिवे बंद असल्याबाबत मिरज व सांगली स्थानकात रेल्वे अधिकार्‍यांकडे प्रवाशांनी तक्रारी केल्या.

लंगरपेठच्या डॉक्टरला लुटल्याप्रकरणी मिरजेतील तरूणास अटक

गाडीतील गैरसोयीमुळे प्रवाशांना बराच मानसीक त्रास सहन करावा लागला. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पॅसेंजर गाडी सोडण्यात येत आहे. डेमू लोकल सोडण्याबाबत प्रवासी संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला होता. एकच दिवस ही गाडी सोडण्यात आली. त्यामुळे या मार्गावर डेमू लोकल धावणार की नाही याबाबत साशंकता आहे.