धक्‍कादायक ! हरवलेला मोबाईल परत देण्यासाठी ‘त्याने’ केली शरीर सुखाची मागणी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पतीचा मोबाईल आणि पाकिट हरवले. पत्नीने पतीच्या मोबाईलवर फोन केला. मात्र फोन केल्यानंतर तो पती ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीने उचलला. आणि तिला पतीचा मोबाईल देण्यासाठी अजब मागणी केली. समोरच्या व्यक्तीने महिलेला तुझ्या पतीचा मोबाईल आणि पाकिट पाहिजे असेल तर शरीरसंबंध ठेव अशी धक्कादायक मागणी केली. त्यामुळे महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकार ?
फिर्यादी महिलेच्या पतीचा मोबाईल आणि पैशांचे पाकिट तसेच कागदपत्रे ९ जून रोजी सकाळी हरवली होती. पती घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला तिच्या मोबाईलवरून फोन कऱण्यास सांगितले. त्यामुळे महिलेने फोन लावला. मात्र त्यानंतर समोरून अनोळखी व्यक्ती बोलत होती. त्याला महिलेने पतीचा मोबाईल परत मागितला. त्या व्यक्तीने तिच्याशी अश्लील संभाषण करण्यास सुरुवात केली.

काय म्हणाला ?
समोरील व्यक्तीला मोबाईल मागितल्यावर महिलेला तो म्हणाला, तुला जर तुझ्या नवऱ्याचे हरवलेली कागदपत्रे, मोबाईल, पैशाचे पाकिट पाहिजे असेल तर आऊट साईडला ये, मी तुझ्या नवऱ्यासारखाच आहे. माझ्याशी तू शरीरसंबंध ठेव.

आरोग्य विषयक वृत्त

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय