Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

नवी दिल्ली : Dengue | देशातील अनेक भागात सध्या डेंग्यू (Dengue) चा कहर वाढत चालला आहे. या काळात मच्छरांपासून सतर्क राहिले पाहिजे. डेंग्यूची लक्षणे इतर हंगामी आजारांशी मिळती-जुळती असल्याने कोणत्याही मोठ्या समस्येपासून वाचण्यासाठी टेस्ट करणे आवश्यक आहे. डेंग्यूसाठी कोणत्या टेस्ट केल्या जातात (Which tests are done for dengue) ते जाणून घेवूयात…

डेंग्यूच्या टेस्टमध्ये डेंग्यू अँटीजन टेस्ट, सीबीसी, आयजीजी सारख्या काही टेस्टचा समावेश आहे. लक्षणांच्या आधारावर कोणती टेस्ट करायची हे डॉक्टर ठरवतात.

1. NS1

या टेस्टलाच डेंग्यू अँटीजेन टेस्ट म्हणतात. डेंग्यूची (Dengue)
लक्षणे समोर आल्यानंतर पाच दिवसांच्या आत ही टेस्ट करणे योग्य मानले जाते.

2. एलायजा

अँटीजनसह एलायजा टेस्टवर विश्वास केला हातो. यात सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला आयजीएम आणि दुसरा आयजीजी.

– आईजीएम टेस्ट डेंग्यूची लक्षणे आल्यानंतर 3-5 दिवसांच्या आत करावी.

– दुसरी टेस्ट आयजीजी सुद्धा 5 ते 10 दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे.

याशिवाय डॉक्टर रूग्णाला पाहून सुद्धा अनेक प्रकारची औषधे देतात. यासाठी कोणतेही लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

डेंग्यूचा ताप आहे किंवा नाही हे कधी समजावे?

– डेंग्यूचा (Dengue) मच्छर चावल्यानंतर एक-दोन दिवसात तापाची लक्षणे दिसू लागतात.

– तापासह डोळे लाल होतात.

– रक्त कमी होऊ लागते.

– काही लोकांना चक्कर येऊ लागल्याने शुद्ध हरपते.

– तासासोबत अंगदुखी होते. सर्दी नसते.

लक्षणे दिसल्यास काय करावे

– प्लेटलेट्सची चाचणी करावी.

– मेडिकलमधून औषध आणून दोन-तीन दिवस वाट पाहू नका.

– ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

हे देखील वाचा

Ajit Pawar | होय, अजित पवारांबाबतचा ‘तो’ बार फुसका ! उपमुख्यमंत्र्यांना ना इन्कम टॅक्सची नोटीस, ना संपत्तीवर ‘टाच’; जाणून घ्या प्रकरण

Social Media App | 11 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढला ‘या’ आजाराचा धोका, वेगाने पसरतोय हातपाय, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Dengue | dengue fever test know which test is used for detect dengue fever check here all details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update