मुंबईत डेंग्यूची दहशत, चार महिन्यांत ९ मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

मुंबईत १६ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २१३वरून सप्टेंबर अखेरपर्यंत ३९८वर पोहचली आहे. या महिन्यांत पाच जणांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. तसेच जून ते सप्टेंबर यादरम्यान डेंग्यूमुळे ९ जणांचे प्राण गेले आहेत. सप्टेंबर महिन्यात ४ हजार ३६५ संशयित रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे ३ हजार ७२१ रुग्ण सापडले होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3b6768bd-c858-11e8-ba83-b9e5ec25acce’]

वाळकेश्वर येथील एका ४२ वर्षीय महिलेला २० सप्टेंबर रोजी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार ते पाच दिवसांपसून त्यांना थंडी, ताप, अंगदुखी असा त्रास होता. काही दिवसांपूर्वी ही महिला लंडनला गेली होती. तेथून परतल्यावर तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुगणालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी होऊन अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाळकेश्वर भागात डेंग्यूसाठी ४२५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. कांदिवलीतील आकुर्ली रोड या परिसरातील एका १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर या भागातील २ हजार १२५ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले.

एका ५८ वर्षीय महिलेला देखील चार ते पाच दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. या महिलेचा १५ सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या परिसरातील ४७६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. सांताक्रूझ येथील आग्रीपाडा परिसरातील ४२ वर्षीय व्यक्तीला सतत १० दिवस अशक्तपणा आणि ताप येत होता. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. काही दिवसांनी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा सप्टेंबर रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

आघाड्या कायम राहिल्यास सत्तापरिवर्तन, एबीपी माझा, सी व्होटर सर्वेक्षण

नाशिक, पुण्यानंतर आता मुंबईमध्येही स्वाइन फ्लू पसरू लागला आहे. जानेवारी महिन्यापासून ऑगस्टपर्यंत एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण नव्हता. मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये स्वाइन फ्लूच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. याच महिन्यात लेप्टोमुळेही एक बळी गेला असून मुंबईत आतापर्यंत लेप्टोमुळे १२ रूग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लूबाबत राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीसोबत सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यात जानेवारीपासून २५ सप्टेंबरपर्यंत ८८ रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यातील मृत रुग्ण हे नाशिक आणि पुण्यातील आहेत.

[amazon_link asins=’B071LSYYDD,B00U6GK4O0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f52770ee-c858-11e8-86bb-17772d83f52f’]

You might also like