लातूर जिल्ह्यात डेंगूचे ‘थैमान’, उदगीरच्या ऋतूराज पवारचा बळी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्ह्यासह उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, शिरूर आनंतपाळ, देवणी, चाकूर,  जळकोट, तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. उदगीर तालुक्यातील बोरतळा तांडा येथील एक मुलगा दगावला आहे. उदगीरचे शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता पवार यांच्या कडून माहीती घेतली असता रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेड देखील कमी पडत आहेत. तसेच रक्ताचे नमुने नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील लॅबकडे पाठविण्यात येत असून रूग्णांवर योग्य तो उपचार चालू आहे असे सांगण्यात येत आहे.

तसेच उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर शहरात धूर फवारणी करण्यात येत आहे असे सांगितले व योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. उदगीर शहरातील नागरिंकाना पाण्याच्या टाक्या रिकाम्या करा, पाणी जास्त दिवस साठवून ठेऊ नका, असे सांगितले जात आहे. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालय खचाखच भरलेले दिसून येत आहेत.

उदगीर तालुक्यातील नळगीर परिसरात डेंगूने थैमान घातले असून नळगीर सह नागलगाव, मांजरी पिंपरी, बोरतळातांडा, कोदळी, सुमठाण, देऊळवाडी, आवलकोड, कौळखेड, मललापूर, कुमदाळ, गुरधाळ, आदी गावात डेंगू संशयित रुग्ण आढळून येत आहेत. बोरतळातांड्यातील प्रा. संतोष लक्ष्मण पवार यांचे चिरंजीव ऋतुराज संतोष पवार वय वर्षे १० याचे आज दुःखद निधन झाले. याने उदगीर येथील खाजगी रूगणालयात उपचार घेतले पण त्याला लातूर येथील रूगणालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी सांगीतले. लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. तांड्यासह परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांत डेंगू रोगामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visit : policenama.com